SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गॅस टंचाईला चाप! पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर 'कंट्रोल रूम' सज्जसीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतरसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी सुरू : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलशिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहातडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशजीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील; डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण गडहिंग्लज-आजरा 'बायपास'साठी धनंजय महाडिक संसदेत कडाडले; वाढत्या अपघातांकडे वेधले लक्ष!‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांना अभिवादन ...परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेसुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!

जाहिरात

 

जीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील; डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण

schedule12 Mar 26 person by visibility 117 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाताना समोर येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा,असे प्रतिपादन मार्वलस ग्रुपचे चेअरमन  संग्राम पाटील यांनी दिला. ते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री.पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या उपस्थितीत अकॅडमीक चॅम्पियन म्हणून सोहेल किल्लेदार याला गौरविण्यात आले.

पाटील  म्हणाले , भविष्यात आपण गिग इकॉनोमी मध्ये काम करणार आहोत, त्यामुळं विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत काम करण्याची तयारी ठेवावी.
 एखाद्या हिऱ्याला पैलू पडल्यानंतर जसा तो चमकतो, त्याची किंमत वाढते, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेऊन त्यांना  पैलू पाडण्याचे काम डी वाय पाटील पॉलिटेक्निक  करत आहे , असे  त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात  प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी वर्षभरातील  क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक शैक्षणिक  उपक्रमांचा आढावा घेतला.

या कार्यक्रमात विविध विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या सत्तावीस विद्यार्थी, विद्यार्थिनींचा तसेच  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.


 यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, जिमखाना प्रमुख अक्षय करपे, कॉम्पुटर विभाग प्रमुख डॉ. पी. के. शिंदे, कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळोखे, प्रथम वर्ष समन्वयक सुजाता शिंदे, ट्रेनिंग प्लेसमेंट इन्चार्ज अजय बंगडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.राज अलास्कर आणि पृथ्वीराज ढवण यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes