SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कौशल्याधारित शिक्षणच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे साधन: एम. बी. शेख यांचे प्रतिपादनकोल्हापूर आणि इचलकरजीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी: शोभायात्रेतून विश्वशांती अन् सलोख्याचा संदेश!क्रांतीचे उड्डाण: जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाची ऐतिहासिक झेप!हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिरनेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत९८ लाखांच्या गंडा घालणारा 'लाईफमार्क'चा ठग जेरबंद! नाव बदलून लपलेल्या मुख्य संचालकासह एजंट पोलिसांच्या जाळ्यातकरवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहातरंकाळा प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली १२ कोटींचा ढपला पाडण्याचा घाट; शिवसेनेचा संतप्त सवाल - 'बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आले की काय?'"युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे”पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

जाहिरात

 

हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर

schedule26 Aug 26 person by visibility 280 categoryराज्य

मुंबई : हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करणे आणि महामंडळाचे अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.

हाफकिनच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, वित्त विभागाचे अवर सचिव क. ति. बडगुजर, हाफकिनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक रमेश चव्हाण आणि कर्मचारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तातडीने लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यावर सकारात्मकता दर्शवली. तसेच महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मागील अधिवेशनात मागणी केलेल्या विशेष निधीचा संदर्भही यावेळी देण्यात आला.

हाफकिन महामंडळ अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला लागणाऱ्या औषधांची निर्मिती हाफकिनमध्येच करण्यात यावी, असा प्रस्ताव तात्काळ पालिकेकडे सादर करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी प्रशासनाला दिले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes