SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पहिल्या महायुद्धादरम्यान इटली आणि जर्मनीचा संघर्षभागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागागोकुळ निवडणुकीत शेतकरी पॅनेलची मोर्चेबांधणी; २५ जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका : आमदार सतेज पाटीलप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत हॅटट्रिक!कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टीनेट लावणारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी कालबध कार्यक्रम निश्चितमहिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधवभाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्यासंवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामतडी. वाय. पाटील विद्यापीठात डिझाईनच्या नव्या पर्वाला सुरुवात

जाहिरात

 

पूनमताई तोडकर यांच्याकडे 'नरेंद्र मोदी विचार मंच'च्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची धुरा!

schedule27 Aug 26 person by visibility 514 categoryसामाजिक

कोल्हापूर : नरेंद्र मोदी विचार मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा दृढ संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत पूनमताई तोडकर म्हणाल्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत केली जाणार असून, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारले जाईल.

 विचारधारेशी जोडलेल्या नवीन कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विविध जिल्ह्यांचा दौरा करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार असून, जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातील. 
महिलांना सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात अधिकाधिक सहभागी करून घेतले जाईल.  युवकांना संघटनेशी जोडून शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. नागरिकांच्या स्थानिक समस्या आणि जनहिताचे प्रश्न संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शन कार्यक्रम असे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवले जाईल.
या निवडीबद्दल मंचाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूनमताई तोडकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


🟠  "पश्चिम महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विचार मंचाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासोबतच सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहणे, महिला आणि युवकांना नेतृत्वाची संधी देणे आणि जनसेवेला प्राधान्य देणे, हा आमचा प्रमुख संकल्प आहे."
▪️— पूनमताई तोडकर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes