‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये व्यासपीठ
schedule22 Aug 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या उज्ज्वल, सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ देणाऱ्या ‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ या विद्यार्थी नवोपक्रम स्पर्धेचे, तसेच तुलसी ब्लड बँक यांच्या सहकार्यातून "रक्तदान" शिबिराचे आयोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “एक चांगली आयडिया संपूर्ण शहराचे स्वरूप बदलू शकते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडून त्यावर व्यवहार्य उपाययोजना सुचवाव्यात,” असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांमधील नवकल्पना, संशोधनवृत्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता भविष्यात समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूरच्या विकासाला विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून नवी दिशा देत २०३५ मधील सक्षम, स्मार्ट व सुंदर कोल्हापूरची संकल्पना साकारण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. संजय घोडावत विद्यापीठाच्या चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. योगेश पोवार, प्रा. विनायक पावटे, रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक डॉ अर्जुन पाटील, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रेया गुरव हिने केले.