SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार :जिल्हाधिकारी अमोल येडगेविद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्रजनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचनादऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदतयेत्या मंगळवारी नोकरी इच्छूक महिला उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - मुदतवाढकोल्हापूरात ‘संपूर्ण गीतरामायण’चा भव्य सोहळा : २३ ते २६ मार्च दरम्यान आयोजनकोरे अभियांत्रिकेत बौद्धिक संपदा हक्क जागरूकता विषयावरील कार्यशाळेचे आयोजनमाणगाव परिषद : सामाजिक क्रांतीचा एल्गारचिवचिव हरवलीय कुठे? : जागतिक चिमणी दिन आणि आपली जबाबदारी

जाहिरात

 

येत्या मंगळवारी नोकरी इच्छूक महिला उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

schedule20 Mar 26 person by visibility 123 categoryराज्य

 कोल्हापूर :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मंगळवार, 24 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारेमाळ, कावळा नाका येथे नोकरी इच्छुक महिला उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

  या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 2 खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 40 पेक्षा जास्त रिक्तपदे या प्लेसमेंट ड्राईव्हकरिता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 12 वी व कोणत्याही शाखेतील महिला पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.  

   इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.i‍n  आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes