SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कौशल्याधारित शिक्षणच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे साधन: एम. बी. शेख यांचे प्रतिपादनकोल्हापूर आणि इचलकरजीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी: शोभायात्रेतून विश्वशांती अन् सलोख्याचा संदेश!क्रांतीचे उड्डाण: जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाची ऐतिहासिक झेप!हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिरनेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत९८ लाखांच्या गंडा घालणारा 'लाईफमार्क'चा ठग जेरबंद! नाव बदलून लपलेल्या मुख्य संचालकासह एजंट पोलिसांच्या जाळ्यातकरवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहातरंकाळा प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली १२ कोटींचा ढपला पाडण्याचा घाट; शिवसेनेचा संतप्त सवाल - 'बहुतेक कोल्हापुरात एलियन्स आले की काय?'"युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे”पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालक सभा उत्साहात; विद्यार्थिनींच्या प्रगतीचे पालकांकडून कौतुक

schedule26 Aug 26 person by visibility 473 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे  मंगळवारी संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात इयत्ता ९ वी व १० वी मधील विद्यार्थिनींच्या पालकांची सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली. उपस्थित पालकांच्या हस्ते रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर उपमुख्याध्यापक रत्नाकर घाटगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात सभेचा उद्देश स्पष्ट केला. सभेदरम्यान शाळेतील शिक्षकवृंदाने पालकांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
 
 व्ही. व्ही. पाटील: यांनी शालेय शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.अश्विनी बागी: यांनी विद्यार्थिनींसाठीच्या विविध बाह्य परीक्षा आणि त्यातील सहभागाचे फायदे याविषयी माहिती दिली.

सभेच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका  सविता आर. पाटील यांनी शाळेतील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, "आज आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कोडिंग शिकत आहेत, ॲप विकसित करत आहेत आणि स्वतःच्या वेबसाइट तयार करत आहेत. क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थिनींनी उत्कृष्टता मिळवावी, यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील आहे." या आधुनिक उपक्रमांची माहिती ऐकून पालकांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मोहिनी भांडवले व  रुपाली धुमाळ यांनी अत्यंत आकर्षक रीतीने केले, तर  सचिन परीट यांनी आभार  मानले. या यशस्वी व महत्त्वपूर्ण सभेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes