SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्तअश्रूंची धार आणि सुन्न आठवणी: पहलगाम आतंकवादी हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजलीनारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चानिवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगताबारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला 'इंडिया स्किल्स ' स्पर्धेमध्ये रौप्यपदकवारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’

जाहिरात

 

डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला 'इंडिया स्किल्स ' स्पर्धेमध्ये रौप्यपदक

schedule21 Apr 26 person by visibility 180 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आयोजित 'इंडिया स्किल्स' राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत  रौप्य पदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय 'वर्ल्ड स्किल्स' स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याना मिळणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल निकिता व श्रेयस यांचे अभिनंदन केले.

'इंडिया स्किल्स' ही देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे. यामध्ये तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष कामाचा वेग याचा कस लागतो. 'लँडस्केप गार्डनिंग' सारख्या आव्हानात्मक प्रकारात दिलेल्या मर्यादित वेळेत निसर्गरम्य आराखडा तयार करणे, दगडी बांधकाम आणि झाडांची शास्त्रोक्त मांडणी अशा टप्प्यांतून या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

   संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी श्रेयस माने आणि निकिता कोळेकर या जोडीने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आहे. त्यांनी मुंबई येथे झालेय राज्य स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक तर अहमदाबाद येथे झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. त्यानंतर आता नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 'लँडस्केप गार्डनिंग' मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल त्यांना ७५ हजार रुपये रोख, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी, राजस्थानचे उद्योग आणि क्रीडा मंत्री कर्नल राजवर्धन राठोड, महाराष्ट्राचे  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, बिहारचे कौशल्य विकास मंत्री संजय सिंह 'टायगर', उत्तर प्रदेश व्यावसायिक शिक्षण मंत्री कपिल देव अग्रवाल, हरियाणाचे युवक कल्याण मंत्री गौरव गौतम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. 

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी श्रेयस व निकिता यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी इंडिया स्किल्स’ सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धेत मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद  व कौतुकास्पद आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, सर्जनशीलता आणि चिकाटी त्यांनी प्रभावीपणे दाखवून दिली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेचे नाव देशपातळीवर उजळले असून, पुढील ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेतही ते निश्चितच भारताचे नाव उंचावतील, असा  विश्वास डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी  कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, डेप्युटी रजिस्ट्रार आश्विन देसाई, विभाग प्रमुख डॉ ग्रंथेज ओतारी, प्रा. शरद रणभिसे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes