SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपदमहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवसकोल्हापुरात २७ एप्रिलला महागाईविरोधात रेशन बचाव समितीचा धडक मोर्चा; हजारो नागरिक रस्त्यावर उतरणारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी यांची निवडपुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यमइंग्रजी भाषा दिन: जागतिक संवादाचे माध्यम'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'चे नियम धाब्यावर बसवून कोल्हापुरात वृक्षहत्या; सुराज्य अभियानाची फौजदारी कारवाईची मागणी५०० हून अधिक भाताचे प्रकार बनवून कोल्हापुरात नवा जागतिक विक्रम रचणार; मास्टर शेफ दिग्विजय भोसलेंची घोषणाकृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ

जाहिरात

 

लिशा हॉटेल ते सदरबाजार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

schedule22 Apr 26 person by visibility 163 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 4 (छ. ताराराणी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज लिशा हॉटेल ते सदर बाजार चौक परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 2 हातगाड्या, 4 शेड काढण्यात आले. तसेच 7 अनाधिकृत हातगाड्या स्वत: मालकांनी काढूण घेतल्या. 

 ही कारवाई महापौर रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्र. 4 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

 महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes