SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपदमहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवसकोल्हापुरात २७ एप्रिलला महागाईविरोधात रेशन बचाव समितीचा धडक मोर्चा; हजारो नागरिक रस्त्यावर उतरणारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडआप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी यांची निवडपुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यमइंग्रजी भाषा दिन: जागतिक संवादाचे माध्यम'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'चे नियम धाब्यावर बसवून कोल्हापुरात वृक्षहत्या; सुराज्य अभियानाची फौजदारी कारवाईची मागणी५०० हून अधिक भाताचे प्रकार बनवून कोल्हापुरात नवा जागतिक विक्रम रचणार; मास्टर शेफ दिग्विजय भोसलेंची घोषणाकृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ

जाहिरात

 

५०० हून अधिक भाताचे प्रकार बनवून कोल्हापुरात नवा जागतिक विक्रम रचणार; मास्टर शेफ दिग्विजय भोसलेंची घोषणा

schedule22 Apr 26 person by visibility 219 categoryसामाजिक

कोल्हापूर: येथील 'अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट'च्या वतीने खाद्यक्षेत्रात एक ऐतिहासिक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि त्यांची टीम एकाच वेळी जगातील विविध खाद्यसंस्कृतींमधील ५०० हून अधिक भाताचे प्रकार तयार करून नवा विश्वविक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

याआधी सर्वात मोठी 'मिसळ' तयार करण्याचा विक्रम नावावर असलेल्या शेफ भोसले यांनी, कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण जागतिक स्तरावर नेण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

​या उपक्रमात १० अनुभवी शेफसह संस्थेच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये भारतीय परंपरेतील बिर्याणी, पुलाव, खिचडी यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसोटो, पायला आणि सुशी यांसारख्या वैविध्यपूर्ण पदार्थांची रेलचेल असेल. केवळ विक्रम प्रस्थापित करणे हाच उद्देश नसून, भाताच्या माध्यमातून जागतिक खाद्यसंस्कृतीचा गौरव करणे, विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव देणे आणि सांस्कृतिक समन्वय साधणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे शेफ दिग्विजय भोसले यांनी नमूद केले आहे. या आगळ्यावेगळ्या प्रयत्नाकडे आता संपूर्ण खाद्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes