SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोरगरिबांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही म्हणुन ते सरकारी दवाखान्यात येतात याची जाणीव ठेवुन आरोग्य सेवा बजावा : मंत्री हसन मुश्रीफविधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पावसाळी अधिवेशन २०२६ पूर्वतयारीचा आढावाराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईतअनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकाळम्मावाडीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहनआजचा विद्यार्थी हा उद्याचा सक्षम, सुजाण नागरिक : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; शिरोळ तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतकोल्हापूर महानगरपालिका : भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर कोल्हापूर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजराउत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली!दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत

जाहिरात

 

काळम्मावाडीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

schedule15 Jun 26 person by visibility 117 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटली असून काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून काळम्मावाडी धरणक्षेत्रातील इन्टेकवेल व जॅकवेल परिसरात साचलेला गाळ काढण्याचे काम दोन एक्स्कॅव्हेटर मशिनद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

  काळम्मावाडी योजनेतून पाणी उपसा बंद झाल्यामुळे शहराला पर्यायी शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र पंचगंगा नदीची पाणीपातळीही कमी झाल्याने शिंगणापूर येथून मर्यादित स्वरूपातच पाणी उपसा करता येत आहे. जल संपदा विभागाशी महानगरपालिकेने समन्वय साधून राधानगरी धरणातून पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन केलेले आहे. मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत शिंगणापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

  पावसाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरेसा राहावा यासाठी नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून व काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes