SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोरगरिबांना खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही म्हणुन ते सरकारी दवाखान्यात येतात याची जाणीव ठेवुन आरोग्य सेवा बजावा : मंत्री हसन मुश्रीफविधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतला पावसाळी अधिवेशन २०२६ पूर्वतयारीचा आढावाराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईतअनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकाळम्मावाडीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहनआजचा विद्यार्थी हा उद्याचा सक्षम, सुजाण नागरिक : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; शिरोळ तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतकोल्हापूर महानगरपालिका : भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर कोल्हापूर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजराउत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली!दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

schedule15 Jun 26 person by visibility 159 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने शहरातील सर्व महापालिकेच्या शाळांमध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करून प्रवेशाचा पहिला दिवस संस्मरणीय केला.

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये सजविलेल्या छोट्या डबलडेकर बसमधून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली, तर काही ठिकाणी औक्षण करून त्यांचे स्वागत करुन शाळांच्या समस्या समजून घेतल्या व शाळांना मार्गदर्शन केले. सुमारे दोन महिन्यांनंतर शाळा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. नवीन मित्र, नवीन पुस्तके आणि आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. सुरुवातीला रडणारी मुलेही प्रवेशोत्सवातील आनंदी वातावरणामुळे लवकरच शाळेच्या वातावरणात मिसळून गेली.

प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने शाळा भेटींचे विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळांनीही पूर्वतयारी पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आवश्यक तयारी केली होती.

महापौर रुपाराणी निकम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मनपा ल. कृ. जरग विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.

प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने महापौर रुपाराणी निकम यांनी सर्व नगरसेवकांना आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सर्व अधिकाऱ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी प्रेरणादायी शाळा भेटी देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिरोळे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, महिला व बालकल्याण समिती सभापती  कौसर बागवान, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त किरण धनवाडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, शांताराम सुतार तसेच इतर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. नशेचे दुष्परिणाम समजावून सांगत निरोगी व सुसंस्कृत जीवनाचा संदेश देण्यात आला. नवीन शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला प्रवेशोत्सव विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी प्रेरणादायी ठरला.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes