SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनमेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी ३० हजार शेणी दान उत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरणनिवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यालयांची अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कारडीकेटीईच्या दीपक खुबन्नावरची स्केटिंगमध्ये दबदबा दोन सुवर्णपदकांसह राज्यस्तरवर निवडसंविधानाच्या आकलनासाठी मूलभूत संरचना समजून घेणे महत्त्वाचे: डॉ. विलास शिंदे कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील 92 डिजीटल बोर्ड हटविलेयुवा आणि नव शेतकरी तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत मागणीमाजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते 25 लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ

जाहिरात

 

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला पुन्हा तूप पूरवठ्याची ऑर्डर; चालू आर्थिक वर्षात २८० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार : अरुण डोंगळे

schedule29 May 25 person by visibility 526 categoryउद्योग

कोल्हापूर : उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जात आहे. आता सलग दुसऱ्या वर्षी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पुन्हा एकदा २८० मे.टन गाय तूप पूरवठ्याची ऑर्डर गोकुळ दूध संघास प्राप्त होत असून हे टेंडर म्हणजे गोकुळच्या गुणवत्तेची आणि पारदर्शक व्यवस्थेची दिलेली पावती असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

  सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी, मुंबई यांना संघामार्फत सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षामध्ये गाय तूप पुरवठा करण्याचे २५० मे. टन चे टेंडर मिळाले होते. पुढील २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता गाय तूप पुरवठा करणेबाबतचे टेंडर संघामार्फत भरले होते या टेंडर प्रक्रियेमध्ये गोकुळ संघ व इतर दूध संघ यांनीही सहभाग घेतला होता. या करिताचे टेक्निकल बीड व प्लांट इन्स्पेक्शन या स्तरावर गोकुळ दूध संघ यशस्वी झाल्यानंतर अंतिम कमर्शियल बीडमध्ये हे टेंडर गोकुळ दूध संघाला मिळाले असून त्याचा खरेदी आदेश लवकरच प्राप्त होईल.

 गाय दुधाची संकलनामध्ये झालेली वाढ लक्षात घेता गाय दूध तसेच गाय दुधापासून बनवलेले दुग्ध पदार्थ यांची निर्गत होणे हे संघापुढे आव्हान असून यामधील एक सकारात्मक पाऊल म्हणजे प्राप्त होत असलेले गाय तूप पुरवठ्याचे हे टेंडर आहे.

 मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील एक श्रद्धास्थान असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक विधी, महापूजा, नैवेद्य व प्रसादासाठी उच्च प्रतीच्या तुपाचा वापर केला जातो. यासाठी मंदिर प्रशासनाकडून गुणवत्तेची कसून चाचपणी केली गेली आणि त्यात गोकुळच्या गायीच्या तुपाला प्राधान्य देण्यात आलं.

 “गोकुळचे तूप हे दर्जेदार असल्याने त्याचा सुवास, चव आणि पोषणमूल्ये टिकून राहतात. या गुणवत्तेमुळेच सिद्धिविनायक मंदिराने पुन्हा एकदा गोकुळला पसंती दिली” आहे असे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes