SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहनकडोलीत अवैध गुटख्यावर 'सर्जिकल स्ट्राईक'!इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ . राजेश क्षीरसागरकोल्हापूर एलसीबीचा 'डाव'; कर्नाटकचा अट्टल चोरटा गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करारजोतिबा चैत्र यात्रेसाठी कोल्हापूर पोलिसांचे कडक वाहतूक नियोजन; जड वाहनांना बंदी व पार्किंगचे नवे नियम लागूकोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात रविवारी स्वच्छता मोहिमकोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंदडॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती पुरस्कार जाहीरश्वास, ध्यास आणि जगण्याचं शास्त्र... रंगभूमी!

जाहिरात

 

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार

schedule27 Mar 26 person by visibility 166 categoryराज्य

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि  जागतिक स्तरावरील अग्रगण्य असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी नवे दालन खुले होईल असा विश्वास कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या सामंजस्य करारामध्ये संयुक्त प्रकल्प, सहकार्यात्मक संशोधन, शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रम, ड्यूअल डिग्री प्रोग्राम्स, ‘सेमिस्टर अब्रॉड’, इंटिग्रेटेड लर्निंग, इन्क्युबेशन व स्टार्टअप हब्स, विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण तसेच शैक्षणिक साहित्य व प्रकाशनांची देवाणघेवाण यांचा समावेश आहे. ‘हँड्स-ऑन’ शिक्षण, एकात्मिक शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप व स्टडी टूर यावर विशेष भर दिला जाणार आहे.

जगातिक विद्यापीठांच्या यादीत ३३ व्या क्रमांकावर असलेल्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्चर, बिझनेस, डिझाइन इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रोबोटिक्स, मीडिया कम्युनिकेशन आणि प्रोसेसिंग इंजिनिअरिंग यांसारख्या विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. डी. वाय. पाटील ग्रुपच्या विद्यार्थ्याना या करारामुळे जागतिक संधी उपलब्ध होणार आहेत.

यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, रजिस्ट्रार डॉ. जयेन्द्र खोत त्याचबरोबर प्रा. अ‍ॅना डेलेटिक, प्रा. दीपक दुबल, प्रा. शिमुल हक, प्रा. अजय पांडे, असोसिएट प्रा. इंदिरा प्रसादम, प्रा. आशीष भास्कर, डॉ. मुरली भूपती, डॉ. संग्राम पाटील, डॉ. शिवानंद शिरकोळे, डॉ. जयदीप पाटील, डॉ. उत्कर्ष आवळेकर, डॉ. सदाशिव कल्याण आदी मान्यवरांच्या उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय. पाटील समूहाच्या शैक्षणिक प्रवासाचा व शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आणि विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली.

प्रा. अ‍ॅना डेलेटिक व प्रा. दीपक दुबल यांनी  क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीबाबात माहिती सादर केली. डॉ. जयेन्द्र ए. खोत यांनी आभार मानले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र -कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes