SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवसेना मदत कक्ष कोल्हापूरतर्फे आरोग्य दूत राजेंद्र मकोटे यांचा सत्कारसेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबत आवश्यक जागेचा प्रस्ताव आठ दिवसांत कोल्हापूर महापालिकेकडे द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरडीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागतील १६० विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर्सवारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार : एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना दिलासाकोल्हापूर : 60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठावकोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात 4830 नागरीकांची तपासणीमुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला पुन्हा तूप पूरवठ्याची ऑर्डर; चालू आर्थिक वर्षात २८० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार : अरुण डोंगळेकोल्हापूर हायकर्सची पवित्र जल संकलन मोहीम - २०२५४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यताकोल्हापूर महापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा : 'आप'ची बैठकीत मागणी

जाहिरात

 

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

schedule28 May 25 person by visibility 239 categoryराज्य

मुंबई : शासकीय, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथील करून या धोरणास स्थगिती देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

शासकीय, महानगर पालिका यांच्या वैद्यकीय महविद्यालयातून एमबीबीएस अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर विहीत कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना एमडी, एमएस तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरवता येणार नाही, असा शासन निर्णय 2017 साली घेण्यात आला होता. त्यामुळे बंधपत्रित सेवेच्या अटीस स्थगिती देण्यात आल्यामुळे आता पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

बंधपत्रित सेवांची अट 2019-20 मधी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून लागू करण्यात आली होती. तसेच याबाबत विद्यार्थी संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या अटीची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्यात येत नव्हती. यंदाची पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा ही जून महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बंधपत्रित सेवेच्या अटीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच बंधपत्रित सेवेसाठी आवश्यक जाता सार्वजनिक आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पदवी अभ्याक्रमानंतरची बंधपत्रित सेवा पूर्ण असणे या धोरणास तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes