SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते व सत्यशोधक महात्मा जोतिराव फुलेनवे दानवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १९३ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : अतिक्रमण आणि नागरी प्रश्नांवरून स्थायी समिती सभेचे कामकाज रोखले; जोपर्यंत कारवाईचे उत्तर नाही, तोपर्यंत कामकाज नको; सदस्यांचा आक्रमक पवित्राचंबुखडी मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व दुरुस्तीमुळे सोमवारी बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार​​"संविधानाचा खरा सन्मान राखण्याचे काम भाजपकडूनच; काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे" : खा. धनंजय महाडिककागलमध्ये उद्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयांचा प्रवेश समारंभधारावी येथील सुविधा केंद्राला महापौरांची भेट; CSR फंडिंगच्या माध्यमातून कोल्हापुरात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प!हिंदकेसरी नेर्ली माळ येथे रविवारी भव्य ‘राजेश केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार; लाखो रुपयांची रोख पारितोषिकेकृष्णा–भीमा नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणीरगेडियनतर्फे कोल्हापुरात शनिवारी 'मिडनाईट सायकल राईड'; फिट इंडिया अभियानांतर्गत आयोजन

जाहिरात

 

धारावी येथील सुविधा केंद्राला महापौरांची भेट; CSR फंडिंगच्या माध्यमातून कोल्हापुरात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प!

schedule27 Nov 26 person by visibility 238 categoryमहानगरपालिका

मुंबई : येथील धारावी झोपडपट्टी परिसरात हिंदुस्तान युनिलिव्हर, HSBC आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्राला कोल्हापूरच्या महापौर  रूपाराणी  निकम यांनी भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची व महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती घेतली.

या सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

या भेटीमागील प्रमुख उद्देश म्हणजे अशा यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करून CSR (Corporate Social Responsibility) अर्थात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातही महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाचे विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणणे.

खासगी कंपन्यांच्या CSR निधीचा योग्य विनियोग करून कोल्हापूर शहरातील महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक सुविधा व विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes