SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिससरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटीलसीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजनपंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल : आमदार यड्रावकरकोल्हापूर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागरसन्मान ..... कर्तृत्वाचा !कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

प्रा. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

schedule24 Aug 26 person by visibility 256 categoryसामाजिक

मुंबई :  मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) पुण्यात निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भाषा, साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रा. यास्मिन शेख यांनी आयुष्याची अनेक दशके मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि अध्यापनाला वाहिली.

मराठीवरील प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन शोकदायी असल्याची भावना व्यक्त करून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. शेख यांचा जीवनप्रवास मराठीच्या प्रेमाने भारलेला होता. एखाद्या भाषा शिक्षकाने त्या भाषेवर किती निखळ, प्रांजळ प्रेम करावे याचे प्रा. शेख मूर्तीमंत उदाहरण ठरल्या. शिक्षिका, लेखिका, भाषा शास्त्रातील संशोधन आणि अभ्यासक या नात्याने आयुष्यभर भाषाशास्त्रात रमल्या. मराठी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. यातूनच त्यांनी मराठी व्याकरणात प्रदीर्घ काळ संशोधन केले. अभिजात मराठी भाषेसोबतच, अन्य भारतीय भाषांचाही संशोधक म्हणून अभ्यास केला. अन्य भाषांबाबतही त्या तितक्याच जिव्हाळ्याने मांडणी करत. भाषेचे सौंदर्य खुलवून सांगणारी आणि सौष्ठव समजून देण्याची त्यांची शैली नव्या पिढीलाही भावली. शब्दांचे सौंदर्य आणि व्याकरणदृष्ट्या अचूक वापर याबाबत त्यांनी सहजसोप्या पद्धतीने मांडणी केली. या अंगाने त्यांनी केलेले लेखन, संशोधन मराठी भाषेच्या दृष्टीने अमूल्य ठेवा ठरावे असे आहे. निवृत्तीनंतरही प्रा. शेख भाषाशास्त्रातील संशोधन-अभ्यासात कार्यमग्न राहिल्या. त्यांच्या निधनाने भाषाशास्त्रात अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ही मराठी साहित्य क्षेत्रासह, भाषाशास्त्राची मोठी हानी आहे. 

प्रा. शेख यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes