SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिससरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटीलसीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजनपंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल : आमदार यड्रावकरकोल्हापूर शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य : आ. राजेश क्षीरसागरसन्मान ..... कर्तृत्वाचा !कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

सन्मान ..... कर्तृत्वाचा !

schedule24 Aug 26 person by visibility 282 categoryसामाजिक

कोल्हापूर :  महास्ट्राईड’ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने १०० टक्के गुणांसह नुकताच राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे हे यश जिल्हयाला प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचे 'कोल्हापूर फर्स्ट'ने ठरविले.

  त्यानुसार आज कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्षांसह आणि संलग्न विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आले. त्यांनी तमाम कोल्हापूरकरांच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा गौरव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर प्रेमाची शाल घातली आणि फ्रेम केलेले विशेष गौरव पत्र प्रदान करून त्यांच्या कर्तृत्वाचा विशेष सन्मान केला ...!       संपूर्ण राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या रांगड्या कोल्हापूर जिल्ह्याने विकसित महाराष्ट्र ध्येय साध्य करण्याकरिता एक पाऊल पुढे टाकले आहे. हे पाऊल सदैव अग्रेसर असेच पडत राहील अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली .

 तर जिल्हा प्रशासनाच्या सर्व लोकाभिमुख उपक्रमाला कोल्हापूर फर्स्टचा सदैव पाठिंबाच असेल असा विश्वास कोल्हापूर फस्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी यावेळी दिला. तसेच भविष्यात कोल्हापूरचा विकास अधिक गतीने व्हावा यासाठी कोल्हापूर फर्स्ट'तर्फे पश्चिम महाराष्ट्र विकास परिषदेचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले .

   लगतच्या कालखंडात कोल्हापूर - विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या बाबी मार्गी लागल्या आहेत. सर्किट बेंच ,महालक्ष्मी - जोतिबा तिर्थक्षेत्र विकास आराखडा , आयटी पार्कची उभारणी, नवीन औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाची प्रक्रिया आणि नुकतीच क्रिकेट स्टेडियमसाठी उपलब्ध झालेली जागा,या सर्व बाबी जिल्ह्याच्या भविष्यातील मोठ्या विकासाची दारे खुली करणाऱ्या आहेत.

  यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’संलग्न संस्था कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले,उपाध्यक्ष भरत जाधव,सचिव रणजीत जाधव,खजिनदार बदाम पाटील,हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग,ट्रॅव्हल एजंट असो .चे अध्यक्ष बळीराम वराडे,जयदीप पाटील,सचिन मेनन,जितूभाई शाह आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes