SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळचा निकाल धक्कादायक, पण कौल मान्य; महायुतीकडून निकालाचे आत्मचिंतन करू : खा. धनंजय महाडिकगोकुळचा निकाल धक्कादायक, पण कौल मान्य; महायुतीकडून निकालाचे आत्मचिंतन करू : खा. धनंजय महाडिकआमदार सतेज पाटलांची गोकुळ निवडणुकीत कमाल; समविचारी आघाडीची बाजी! दसरा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुन चौगुले, ध्रुव गोयल, सिया परांजपे, शारंग भोईटे, जय पाटील, हर्ष कांबळे, विवान परांजपे, राजवर्धन मोरे विजेतेगोकुळ दूध संघ निवडणूक निकाल: महायुतीमधील भांडणे आणि बाद मते ठरली पराभवाचे कारण : नामदार हसन मुश्रीफतावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई'गोकुळ'वर सतेज पर्व! ...आपलं गोकुळ टिकणार!पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कामगारांना २ ते ४ तासांची विशेष सवलतशुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान ! विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत असे करा मतदान...गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न पैशाअभावी थांबू देणार नाही; व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

कोल्हापुरात खळबळ! जयसिंगपूरजवळ दिवसाढवळ्या सराईत गुन्हेगार महेश दळवी यांची गोळी झाडून निर्घृण हत्या

schedule19 Oct 26 person by visibility 128 categoryगुन्हे

कोल्हापूर : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला हादरवून टाकणारी एक मोठी घटना समोर आली आहे. जयसिंगपूरजवळील दानोळी येथे आज (सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास झालेल्या थरारक गोळीबारात सराईत गुन्हेगार महेश बजरंग दळवी (उर्फ एम.डी., वय ४२/४३) यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दहशत पसरली असून, दिवससाढवळ्या घडलेल्या या खुनामुळे खळबळ उडाली आहे.

 महेश दळवी हे आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून जात होते. याच दरम्यान, दानोळी-जयसिंगपूर मार्गावरील चांदोली वसाहत तथा धरणग्रस्त वसाहतीजवळील शेत परिसरात दबा धरून बसलेल्या किंवा पाठलाग करत आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या महेश दळवी यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मृत महेश दळवी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होते. ते यापूर्वी गाजलेल्या भरत त्यागी खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक होते आणि नंतर त्यातून निर्दोष सुटले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमीसह ते गावच्या राजकारणातही सक्रिय सहभाग नोंदवत असत, ज्यामुळे या हत्येमागे पूर्ववैमनस्य किंवा राजकीय वादाची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे कसून तपास करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes