वारणा विद्यापीठाचा महारोजगार मेळावा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलला
schedule24 Sep 26 person by visibility 245 categoryशैक्षणिक
वारणानगर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथील सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्राप्त पत्रानुसार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी वारणा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला महारोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.
महारोजगार मेळाव्याची नवीन तारीख आचारसंहिता संपल्यानंतर निश्चित करून स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे.
कृपया याची नोंद सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, नेमणुकीसाठी येणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घ्यावी व सहकार्य करावे, असे वारणा विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.