SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी : आमदार सतेज पाटील यांनी दऱ्याचे वडगाव येथे नागनाथ मंदिर परिसरात कार्यकर्त्यांबरोबर पंगतीत जेवण करून जिव्हाळा, स्नेह जपला

schedule26 Jan 26 person by visibility 442 categoryराजकीय

कोल्हापूर  : आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढत दऱ्याचे वडगाव येथील नागनाथ मंदिर परिसरात कार्यकर्त्यांबरोबर पंगतीत जेवण केले. प्रचाराच्या धावपळीतही कार्यकर्त्यांशी असलेली आपली नाळ जपताना साध्या पंगतीत जेवण करून त्यांनी जिव्हाळा आणि स्नेह जपला.

सत्तेपेक्षा साथ महत्त्वाची मानणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या या कृतीतून कार्यकर्त्यांशी असलेलं घट्ट नातं आणि जमिनीवरचं नेतृत्व अधोरेखित झालं. नागनाथ मंदिराच्या परिसरात पार पडलेल्या या पंगतीनंतर कार्यकर्ते भारावले त्यांच्यात उत्साहाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं वातावरण पाहायला मिळालं. दिवसभराच्या थकव्यावर उतारा ठरलेला हा क्षण प्रचाराच्या धावपळीत एक दिलासा देणारा ठरला.

 जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला तसेच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार निवडून येतील जिल्हा परिषद वर सत्ता येईल असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes