B.Sc.B.Ed. (ITEP) साठी नॅशनल कॉमन एटुन्स टेस्ट (NCTE) अर्ज भरण्याची 16 मार्च अंतिम तारीख
schedule05 Mar 25 person by visibility 567 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे B.Sc.B.Ed (ITEP) या एकात्मिक चार वर्षाच्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 2025-26 ची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. बारावी विज्ञान शाखा उतीर्ण किंवा ज्यानी बारावी विज्ञान शाखेची आताच परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन एट्रन्स टेस्ट (NCTE) सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2025 असून प्रवेश परीक्षा फॉर्म ची लिंक: https://exams.nta.ac.in/NCTE/ आहे
अधिक माहिती करता शिक्षणशास्त्र विभागास संपर्क साधावा असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.