SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

शाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल, वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस

schedule01 Feb 26 person by visibility 186 categoryराजकीय

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह  कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या उद्दिष्ठाला आणि देशाच्या शाश्वत विकासाला वेग देणारा हा अर्थसंकल्प आहे. अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहे

 

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून देशांतर्गत उत्पादन क्षमता, उर्जा सुरक्षा आणि आवश्यक आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. यासह रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, घरगुती खरेदी शक्ती सुधारण्यासाठी आणि नागरिकांना सार्वत्रिक सेवा प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विकास दर वाढला असून, खऱ्या अर्थाने "गरिबी हटाव" च्या दिशेने देशाने वाटचाल अधिक सक्षम केली आहे. विशेषतः चामड्यांची उत्पादने आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त केली असल्याने कोल्हापुरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस येणार आहेत.

एकंदरीत पाहता देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा, शाश्वत विकासाची हमी देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे    आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे . 

 

    

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes