कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रोडवर तरुणाची निघृण हत्या
schedule01 Dec 25 person by visibility 466 categoryगुन्हे
कोल्हापूर : विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोड या शांत परिसरात मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास एका अज्ञात तरुणाची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला त्याला वायरने बांधून त्याचाच गळा आवळण्यात आला आहे.
गुन्हेगारांनी अत्यंत शांतपणे आणि नियोजनपूर्वक हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांना मृत तरुणाचा देह विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत आढळला.
मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून गोळा केले जात असून तपास सुरू आहे.