SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षक दिन: ज्ञानाचा आणि संस्कारांचे जतन करणारा उत्सवजात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढबोगस दस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळमध्ये विजय महायुतीचाच होणार, पण इतका त्रास का झाला? मंत्री हसन मुश्रीफ यांचा थेट सवाल!माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुखकोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेशकोल्हापूर : बाजार गेट, पान लाईन परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाईमहिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा दिमाखात शुभारंभ!के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोलीकोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई: शेल कंपनीच्या नावाखाली म्युल बँक खाती चालवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

कोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई: शेल कंपनीच्या नावाखाली म्युल बँक खाती चालवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

schedule04 Sep 26 person by visibility 220 categoryगुन्हे

कोल्हापूर  : सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपी विविध व्यक्तींची बँक खाती फसवणुकीकरीता भाड्याने, कमिशनवर किंवा अन्य मार्गांनी प्राप्त करून घेत आहेत. फसवणुकीची रक्कम या बँक खात्यांमध्ये वळती करून ती नेट बँकिंगद्वारे इतर खात्यांत हस्तांतरित करणे, रोख काढणे किंवा क्रिप्टो करन्सीत रूपांतरित करण्याचे प्रकार सुरू असतात. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी म्युल बँक खाती उपलब्ध होऊ न देणे हा एक मास्टर स्ट्रोक ठरणार असून, त्या अनुषंगाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून अशा टोळीविरोधात कडक कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. 

पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे माहिती मिळवली.

या माहितीच्या आधारे शाहूपुरी, चौथी गल्ली येथील स्वस्तिक प्लाझा मधील 'टोरकोलाईन पॉवर टूल्स प्रा. लि.' या कंपनीच्या ऑफिसवर छापा टाकला असता तिथे तीन इसम मिळून आले. नितीश कुमार (रा. रोहतक, हरयाणा), अनुप यादव (रा. बेहरोड, राजस्थान) आणि अमित यादव (रा. मेंद्रगढ, हरियाणा) अशी त्यांची नावे असून त्यांनी साथीदार करमवीर उर्फ विजेंद्र सिंह याच्यासह भारत सरकारच्या उद्यम रजिस्ट्रेशनवर नोंदणी करून शेल कंपनी स्थापन केली होती. कोल्हापूर परिसरातील विविध बँकांमध्ये कंपनीच्या नावे चालू (करंट) खाती काढून त्यामध्ये सायबर फ्रॉडमधील जमा होणाऱ्या रकमेत टक्केवारीनुसार हिस्सा वाटून घेत असल्याचे निष्पन्न झाले.


कारवाई दरम्यान पोलिसांनी १४ बँक चेकबुक्स, १० क्युआर कोड, २ क्युआर कोड मशिन, ७ डेबिट कार्ड्स, १ लॅपटॉप, ४ मोबाईल हँडसेट्स, महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि कागदपत्रे असा एकूण अंदाजे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. कोल्हापूर सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बँक खाते भाड्याने देण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी कोणी प्रलोभन दाखवल्यास कोणत्याही अमिषाला बळी पडू नये.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes