SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षक दिन: ज्ञानाचा आणि संस्कारांचे जतन करणारा उत्सवजात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढबोगस दस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळमध्ये विजय महायुतीचाच होणार, पण इतका त्रास का झाला? मंत्री हसन मुश्रीफ यांचा थेट सवाल!माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुखकोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेशकोल्हापूर : बाजार गेट, पान लाईन परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाईमहिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा दिमाखात शुभारंभ!के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोलीकोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई: शेल कंपनीच्या नावाखाली म्युल बँक खाती चालवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोली

schedule04 Sep 26 person by visibility 371 categoryमहानगरपालिका

◼️३५ लॉट्ससाठी  आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे उपस्थितीत ई-ऑक्शन प्रक्रिया

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगर परिवहन उपक्रम (के.एम.टी.) कडील वापरामुळे झीज झालेले व निरुपयोगी ठरलेले विविध वाहनेविषयक साहित्य तसेच भंगार साहित्याची पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ई-लिलावातून रु.५२ लाख ३१ हजार ४२४ इतकी अंतिम बोली प्राप्त झाली आहे.

के.एम.टी. उपक्रमाकडील वापरामुळे झीज झालेले टायर्स, ट्यूब्ज, स्क्रॅप बेअरिंग्ज, कमान पाटे, इंजिन पार्टस्, विविध असेंब्लीज, जळके इंजिन ऑईल बॅरेल्स तसेच इतर अनुपयोगी साहित्याचे एकूण ३५ लॉट्स तयार करण्यात आले होते. या सर्व लॉट्सचा ई-लिलाव गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या मे. शंकर रामचंद्र ऑक्शनियर्स प्रा. लि., पुणे यांच्या माध्यमातून पार पडला.

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत  ई-ऑक्शन प्रक्रिया पार पडली. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह के.एम.टी.चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ई-लिलावाच्या अंतिम बोलीनुसार महानगरपालिकेस रु.५२ लाख ३१ हजार ४२४ रुपये इतका महसूल प्राप्त होणार आहे. या प्रक्रियेमुळे के.एम.टी.कडील दीर्घकाळापासून पडून असलेल्या निरुपयोगी व भंगार साहित्याची पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासोबतच महानगरपालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

महानगरपालिकेच्या मालमत्तेची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, ई-लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता व स्पर्धात्मकता राखणे आणि उपलब्ध संसाधनांमधून अधिकाधिक महसूल मिळविणे या उद्देशाने ही ई-ऑक्शन प्रक्रिया राबविण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes