SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धा उत्साहातइतिहासातील गायब झालेले ११ दिवस...जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणीगोकुळ शिरगांव एमआयडीसीत कंपनीतून कार्बाइड इन्सर्ट व घरफोडीचा माल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंदकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई!कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभकोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्नडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारडी. वाय. पाटील अभियांत्रिकीला क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकन; शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, संशोधन कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान 'शिक्षक कुटुंबांच्या आरोग्यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे आरोग्य कवच योजना' आणणार,' मंगेश चिवटे यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात

schedule02 Sep 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक

वारणानगर : विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि समस्या निराकरणाची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल २८२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, डीन अकॅडेमिक्स डॉ. पी. व्ही. मुळीक, डीन आर. अँड डी. डॉ. आर. व्ही. काजवे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. आर. बी. पाटील तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. ए. पारेख उपस्थित होते.

हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी विविध समस्या व आव्हानांवर तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण उपाय विकसित करून आपल्या कल्पना व प्रकल्पांचे परीक्षकांसमोर सादरीकरण केले. प्रकल्पांचे मूल्यमापन नाविन्यपूर्णता, तांत्रिक अंमलबजावणी, व्यवहार्यता, संभाव्य परिणाम, सादरीकरण आणि टीमवर्क या निकषांच्या आधारे करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणणे, संघभावनेने काम करणे, तांत्रिक समस्या सोडविणे आणि आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडणे यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग हा महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाभिमुख वातावरणाचे द्योतक ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes