SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इतिहासातील गायब झालेले ११ दिवस...जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणीगोकुळ शिरगांव एमआयडीसीत कंपनीतून कार्बाइड इन्सर्ट व घरफोडीचा माल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंदकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई!कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभकोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्नडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारडी. वाय. पाटील अभियांत्रिकीला क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकन; शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, संशोधन कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान 'शिक्षक कुटुंबांच्या आरोग्यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे आरोग्य कवच योजना' आणणार,' मंगेश चिवटे यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने रविवारी भव्य पुरस्कार वितरण सोहळा व शिक्षक मेळावा

जाहिरात

 

डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार

schedule01 Sep 26 person by visibility 262 category

◼️कुशिरे येथे ५०० हून अधिक बीज गोळ्यांची पेरणी

कोल्हापूर : देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा संदेश देत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन विभागातील फिटनेस क्लबतर्फे कुशिरे येथे निसर्ग ट्रेक आणि बीजगोळे निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ५०० हून अधिक बीजगोळे तयार करून परिसरात त्याची पेरणी केली. 

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक प्रसन्नता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश होता. निसर्गरम्य परिसरात ट्रेकचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक बीजगोळे तयार करण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी पोहाळे लेणी येथे भेट देत विद्यार्थ्यांनी परिसराचा नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसाही अनुभवला.

बीजगोळे तयार करण्यासाठी करंज, शेवगा, जांभूळ, सीताफळ, रामफळ, हिरडा आणि बेहडा यांसारख्या स्थानिक व देशी वृक्षप्रजातींच्या बियांचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः बीजगोळे तयार करून त्यांचे कुशिरे व परिसरातील निवडक योग्य ठिकाणी प्रसारण केले. या उपक्रमातून स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सहायक प्राध्यापक अभिजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगितली. बीजगोळ्यांचे पर्यावरणीय महत्त्व, देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनातील विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. रोहित लांडगे, डॉ.  पुरुषोत्तम पेटारे, डॉ.  मुग्धा देशपांडे, डॉ.  रेणुका तुरंबेकर, प्रा.  सागर जानराव, प्रा.  व्यंकटेश बडवे, प्रा.  अनिकेत परदेशी यांच्यासहित श्री. दीपक बंडागळे उपस्थित होते. 

या उपक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes