SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पी. एम. सूर्यघर योजनेत केडीसीसी बँकेसह कागल तालुका देशात एक नंबर आणूया; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन नीट परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशकोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देश पातळीवर आणणार : मंत्री शंभूराज देसाईलोकनेते देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही : मंत्री शंभूराज देसाईमहाराष्ट्र सदन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणसध्याच्या जागतिक परिस्थितीत कोरे अभियांत्रिकीचे प्लेसमेंट अभिमानास्पद : डॉ. विनय कोरेप्रशासनाच्या 'शब्दाला' हरताळ; कोल्हापुरात १५ जूनपासून शेतकरी उतरणार आमरण उपोषणालाअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे ७ जून रोजी मोफत मार्गदर्शन कार्यक्रमडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'चे उद्घाटनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'चे उद्घाटन

schedule05 Jun 26 person by visibility 416 categoryशैक्षणिक

◼️पश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित

कोल्हापूर : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी कुशल तंत्रज्ञ घडविण्याच्या उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे बजाज ऑटो लिमिटेड, पुणे यांच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून उभारण्यात आलेल्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'चे उद्घाटन लोकप्रिय युवानेते आणि आमदार  रोहित पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते.

 पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र आहे. बजाज सी एस आर व्यवस्थापक प्रीयांशी शर्मा यांचे सोबत मान्यवरांनी केंद्राची पाहणी करून उपलब्ध प्रशिक्षण सुविधा, आधुनिक उपकरणे यांची  माहिती घेतली. 

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले , "भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग झपाट्याने विकसित होत असून या क्षेत्रात प्रशिक्षित तंत्रज्ञांची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र काळाची गरज ओळखून उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील." प्राचार्य साळुंखे म्हणाले , "शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याची प्रक्रिया आहे. 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी करून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे हे केंद्र महत्त्वपूर्ण कार्य करेल."  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे म्हणाले "  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , बजाज ऑटो लिमिटेड, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक यांचे हे सहकार्य कौशल्याधारित शिक्षणासाठी आदर्श ठरणारे आहे. उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी सक्षम बनविण्याची क्षमता या केंद्रात आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षण संस्थांची सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे अधोरेखित होते."  ग्लोबल टॅलेंट ट्रॅक  (GTT), पुणे चे सिनिअर डायरेक्टर (ऑपरेशन्स) अमित भोसले यांनी सदरच्या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना बजाज च्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमातून कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

काळे बजाज कोल्हापूर चे संचालक विप्लव कासलीवाल म्हणाले “या केंद्रामध्ये बजाज ऑटो लिमिटेडचा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांची दुरुस्ती, देखभाल, निदान तंत्रज्ञान आणि आधुनिक सेवा पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील इलेक्ट्रिक वाहने वापरणारे लोक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्यास उद्युक्त होणार आहे. उपक्रमाचे प्रमुख इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी “सदरचा तीन महिन्यांचा हा प्रशिक्षण अभ्यासक्रम १२ वी (विज्ञान), आयटीआय आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला असून प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या आधारावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढून शहरातील प्रदूषणास चांगला आळा बसेल ” अशी माहिती दिली.  केंद्राचे समन्वयक प्रा. अभिजित रेडेकर यांनी केंद्राच्या उभारणी दरम्यान महत्वाचे योगदान दिले तसेच उद्घाटन कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.

प्रा. आरती चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील , प्रा. डॉ. महेश साळुंखे , बजाज टू-व्हीलर वाहनांचे अधिकृत विक्रेते, रजिस्ट्रार अमित आवाड , महाविद्यालयाचे पदाधिकारी, सर्व विभागप्रमुख प्राध्यापक, गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes