SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ड्रग्जचा प्रादुर्भाव हा 'नार्को-टेररिझम'चा भाग; भाजयुमोची पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी मोहिमेची मागणी!कोल्हापूर आय.टी. पार्कचा ताबा एमआयडीसीकडे सुपूर्तऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​पाणी जपून वापरा! काळम्मावाडी सबस्टेशनच्या कामामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीतदुचाकीसाठी नवी नोंदणी मालिका 3 जूनपासूनस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाईइंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभकोलोली येथील महिला खुनाचा गूढ उकलला; अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानेच केली होती हत्या, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक!करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदनराष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!

जाहिरात

 

टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी: वाहन नोंदणीसाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ!

schedule27 May 26 person by visibility 111 categoryराज्य

▪️कोल्हापूरकरांनो सुवर्णसंधी गमावू नका; प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) आवाहन

कोल्हापूर : ज्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांच्या इरादापत्राची (Intent Letter) वैधता संपली आहे, अशा वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा प्रकरणांमध्ये वाहन नोंदणीसाठी आता एक महिन्याची विशेष मुदतवाढ देण्यात आली असून, अर्जदारांना २५ जून पर्यंत आपली वाहन नोंदणी पूर्ण करता येणार आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुल्या धोरणाला स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्णयामुळे ज्या अर्जदारांना इरादापत्र जारी झाले होते, परंतु त्याची मुदत संपली होती, अशा वाहनांची नोंदणी आरटीओ (RTO) स्तरावर थांबवण्यात आली होती. परिणामी अनेक वाहनधारक अडचणीत आले होते.

वाहनधारकांची अडचण लक्षात घेता, परिवहन आयुक्त कार्यालय (मुंबई) यांनी मसुद्यात अंशतः बदल करत, वैधता संपलेल्या इरादापत्र धारकांना वाहन नोंदणीसाठी एक महिन्याची सवलत दिली आहे.

 ज्या अर्जदारांच्या इरादापत्राची मुदत संपली आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत २५ जून पूर्वी आपल्या वाहनाची अधिकृत नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे करून घ्यावी. या अंतिम मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes