SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हिंदी भाषा: भारतीय संस्कृतीचा आणि एकतेचा अनमोल दुवामराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने आणि कायदेशीर तोडगा काढावा: खासदार शाहू छत्रपती महाराजगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीमबालशिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाचा पुढाकार : आमदार यड्रावकरअवकाळीग्रस्त ३६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० लाख जमा कोल्हापूर मपालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरीमहिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'युवावर्स' उत्साहातनकारात्मकतेला रामराम; सकारात्मक विचारांची जादू!जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

जाहिरात

 

बालशिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाचा पुढाकार : आमदार यड्रावकर

schedule13 Sep 26 person by visibility 364 categoryशैक्षणिक

◼️शेडशाळ येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण

कोल्हापूर : लहान मुलांच्या मनावर शिक्षणाचे संस्कार करण्याचे काम अंगणवाडीच्या माध्यमातून होते. लहान मुलांचे मन हे कोऱ्या मातीसारखे असते. कुंभार बांधव मातीला जसे रूप देतो, त्याप्रमाणे बालपणीच मुलांना शिक्षणाची गोडी आणि योग्य संस्कार मिळाल्यास उद्याचा सक्षम विद्यार्थी घडतो.

 त्यामुळे ग्रामीण भागातील बालकांना लहानपणापासूनच आनंददायी वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासन अंगणवाड्यांच्या सुसज्ज इमारती उभारण्यावर भर देत आहे. यातूनच भविष्यात सशक्त महाराष्ट्र घडेल, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

शेडशाळ येथे १५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन अंगणवाडी इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

ग्रामीण भागातील लहान बालकांना दर्जेदार, सुरक्षित आणि हक्काचे प्राथमिक शिक्षणाचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नवीन अंगणवाडी इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. नव्या इमारतीमुळे बालकांना शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

अंगणवाडी ही लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया आहे. मुलांचे मन अंगणवाडीत रमावे आणि शिक्षणाची प्रक्रिया त्यांच्यासाठी आनंददायी व्हावी, यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. बालवयातच मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक बालकाला चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक असून, त्यासाठी अंगणवाडी इमारतींसह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे, असेही आमदार यड्रावकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच सुनील संकपाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 
या प्रसंगी माजी सरपंच किरण संकपाळ, वर्धमान कल्याणी, माजी उपसभापती आदिनाथ आरबळे, अविनाश तकडे, फैय्याज अहमद सोलापूरे, लखन लाड, हैदर पाथरवट, गजानन गडगे, शिवकुमार केरिपाळे, आप्पासाहेब कांबळे, महावीर तकडे, शरद हरोले, आनंदा कुम्मे, ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे, अब्दुल जमखंडी, अंगणवाडीच्या सर्व सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes