SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरसी. पी. आर. चे नूतनीकरण एप्रिल अखेर पूर्ण करून एक मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देशपोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीरससेगाव येथे २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजलीकोल्हापुरात 'गुड फ्रायडे' निमित्त ख्रिस्ती बांधवांकडून विशेष प्रार्थना; चर्चमध्ये भाविकांची गर्दीशिधावाटप विभागाचा मोठा धडाका! वैजापूर रोडवर LPG चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्तगुड फ्रायडे : त्याग, क्षमा आणि करुणेचा दिवसभक्ती आणि उत्साहाचा सोहळा! कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात

जाहिरात

 

शिधावाटप विभागाचा मोठा धडाका! वैजापूर रोडवर LPG चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

schedule03 Apr 26 person by visibility 140 category

मुंबई : शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. दि. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.

हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.

याशिवाय घटनास्थळावरून १९.२ किलो क्षमतेचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर तसेच ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस, २ टँकर आणि २६ सिलेंडर असा सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दक्षता पथकाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे २४८० कुटुंबांची गरज भागू शकली असती.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात छत्रपती संभाजी नगर, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes