हरोली व धरणगुत्तीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
schedule18 May 26 person by visibility 295 categoryसामाजिक
शिरोळ : ग्रामीण भागातील विकास हा प्रत्यक्ष कामांवर अवलंबून असतो. गावागावांतील रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, जलसंधारण अशा मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामे राबविली जात आहेत. हरोली येथील पाझर तलाव गाळ काढण्याच्या कामामुळे पाणीसाठा वाढून शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. तसेच धरणगुत्ती येथील दलित वस्ती विकास योजनेतून होणाऱ्या काँक्रिटीकरणामुळे नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे. दोन्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आगामी काळातही दोन्ही गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
हरोली व धरणगुत्ती गावांमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.
हरोली येथे पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी सुमारे ४३ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे तलावातील पाणीसाठा क्षमता वाढून परिसरातील शेतीला मोठा फायदा होणार आहे. तसेच संत रोहिदास नगरातील १० लाख रुपयांच्या काँक्रिटीकरण कामाचाही शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तर धरणगुत्ती येथे विकास योजनेअंतर्गत बेघर वसाहत येथे सुमारे २० लाख रुपयांच्या निधीतून काँक्रिटीकरण कामाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होऊन स्वच्छ व सुरक्षित रस्ते उपलब्ध होणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, पंचायत समिति सदस्य प्रवीण बापसो देसाई, सरपंच तानाजी माने, सदस्य तेजश्री भोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भाऊसो पाटील, नेमिनाथ चौगुले, रामगोंडा पाटील, भरत चौगुले, राजकुमार कांबळे, राजगोंडा पाटील, प्रज्वल कांबळे, अनिल माने, किर्तीकुमार पाटील, अमर पाटील, संग्राम भोसले, शांतिनाथ पाटील, रुपेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तर धरणगुत्ती येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रचिता चंद्रकांत कोळी, पंचायत समिति सदस्य प्रवीण बापसो देसाई, संजय अण्णासो पाटिल (जायगोंड), शिवाजीराव शिंदे, तुकाराम अस्वले, बाळासो जाधव, चिमाजी जाधव, राजू जाधव, शिवाजी जाधव, असगरअली शेख, उमेश पाटील, संजय पाटील (दावाडे ), जितेंद्र कुमार पाटील, शिवराज पोवार, भाऊसो जगताप, बाबासो कारंडे, लखन कांबळे, बाजीराव पोवार, अनिल पाटील, अनिल गायकवाड़, बबलू पाटील, राहुल मिस्त्री, गुंडा पाटील ( दावाडे ), अजित वराळे , आकाश कांबळे, रविंद्र पडियार, सर्जेराव पडियार, संभाजी सोनवले, दरीबा कांबळे, उमेश चौगुले, किरण कांबळे , अर्जुन नरळे , अशितोष जगताप, सद्दाम नदाफ , वैशाली नरळे , जयश्री गोटे , निजव्वा कांबळे, तुषार गोटे आदी उपस्थित होते.