माजी आमदार संजयबाबा घाडगे यांनी घेतली खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट
schedule17 Apr 25 person by visibility 473 categoryराजकीय

▪️कागल तालुक्यात भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही
कोल्हापूर : माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी नुकताच मुंबईत भाजप पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आज संजय बाबा घाडगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाडगे यांनी खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. भाजप हा केडर बेस आणि शिस्तबद्ध पक्ष असून, राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. अशावेळी पक्षाची ध्येय धोरणे आणि सरकारच्या विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. त्याला माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कागल तालुक्यात भाजप पक्ष वाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करू, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला निर्विवाद यश मिळण्यासाठी आपले सर्व कार्यकर्ते कामाला लागतील, अशी ग्वाही संजय बाबा घाडगे यांनी दिली. तसेच महायुती म्हणून यापुढे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, रणजीत मुडुक शिवाले उपस्थित होते.