SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

schedule26 Jan 26 person by visibility 306 categoryउद्योग

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

   संघाचे ताराबाई पार्क येथील आवारात संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करणेत आले. गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक प्रकाश पाटील व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना ये‍थे संचालक डॉ.सुजित मिणचेकर, गडहिंग्‍लज चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक मुरलीधर जाधव, बिद्री चिलिंग सेंटर कर्मचारी भरत देवर्डेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर कर्मचारी शरद जोशी व मारुती मोकाशी यांच्‍या हस्‍ते करणेत आले.

यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक डॉ.चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes