SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत अंतर्गत हॅकाथॉन स्पर्धा उत्साहातइतिहासातील गायब झालेले ११ दिवस...जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याला हलवू नये; सतेज पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे मागणीगोकुळ शिरगांव एमआयडीसीत कंपनीतून कार्बाइड इन्सर्ट व घरफोडीचा माल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंदकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई!कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभकोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्नडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारडी. वाय. पाटील अभियांत्रिकीला क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकन; शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, संशोधन कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान 'शिक्षक कुटुंबांच्या आरोग्यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे आरोग्य कवच योजना' आणणार,' मंगेश चिवटे यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरा; आस्थापना खर्चाची अट शिथिल करा: आमदार सतेज पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

schedule31 Aug 26 person by visibility 375 categoryराज्य

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांमुळे शहराचा विकास आणि दैनंदिन नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेतील अत्यावश्यक व तांत्रिक सेवेतील पदे भरण्यासाठी ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करावी, अशी  मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

​आमदार सतेज पाटील यांनी निवेदनात म्हंटले आहे की, शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुधारित आकृतिबंधातील वर्ग १ ते ४ मधील एकूण ४,४४५ पदांच्या आकृतिबंधास मान्यता दिली आहे. मात्र, सन २०१७ पासून महानगरपालिकेतील तांत्रिक पदे कायमस्वरूपी भरण्यात आलेली नाहीत.
 
सेवानिवृत्तीमुळे सध्या तांत्रिक संवर्गातील तब्बल ८० टक्के पदे रिक्त आहेत. सध्या तांत्रिक संवर्गात केवळ २३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर बांधकाम परवाने, लेआऊट मंजुरी, अतिक्रमण कारवाई, गुंठेवारी नियमितीकरण आणि रस्ते दुरुस्ती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून महापालिका प्रशासनाला मूलभूत सेवा-सुविधा पुरवण्यात मर्यादा येत आहेत.

​महापालिका प्रशासनाने गट 'अ' ते गट 'डी' मधील अत्यावश्यक पदे भरण्यासाठी ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव ११ मार्च २०२६ रोजी नगरविकास विभागाच्या (नवि-२) अपर मुख्य सचिवांकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, जेणेकरून रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल आणि शहरातील विकासकामांना गती मिळेल, असे आमदार सतेज पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes