SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक - प्रा.चेतन सिंह सोलंकीगंजीगल्ली परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा मिल राेलर पूजनकोल्हापुरात शिक्षकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चावाशी येथे 'स्वामी क्लिनिक'चा भव्य शुभारंभ; माफक दरात मिळणार आरोग्य सेवाडी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्नस्ट्रक्चरल इंजिनिअर्सना आता हवी व्यावसायिक सुरक्षा; महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय बैठकीत ठरावनवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभराज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरूकोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठा

जाहिरात

 

गंजीगल्ली परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई

schedule09 Jul 26 person by visibility 207 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.2 छ.शिवाजी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज गंजीगल्ली ते बढी मस्जिद परिसरात धडक कारवाई करत अनधिकृत साहित्यांवर आज कारवाई करण्यात आली.

  या कारवाईमध्ये 3 हातगाडी, 5 स्टॅंड बोर्ड, व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच दुसऱ्यावशिही ही कारवाई सुरु ठेवण्यात येणार आहे.

   महानगरपालिकेच्या ठराव क्र.83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. आजची मोहिम उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कारवाईमध्ये सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण, विभागीय कार्यालय क्र. 2 कडील कर्मचारी व लक्ष्मीपूरीकडील पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes