SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्तअश्रूंची धार आणि सुन्न आठवणी: पहलगाम आतंकवादी हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजलीनारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चानिवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगताबारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला 'इंडिया स्किल्स ' स्पर्धेमध्ये रौप्यपदकवारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’

जाहिरात

 

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शन

schedule21 Apr 26 person by visibility 172 categoryउद्योग

 कोल्हापूर : दुग्धतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांची ‘भारतीय दुग्ध परिषद२०२६’ मध्ये चर्चासत्रातील वक्ते (पॅनल वक्ते) म्हणून निवड झाली आहे.         

  २२ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेत ब्लॉकचेन व उत्पादन तुकडी (लॉट) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूधउत्पादनापासून ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ताआणि विश्वास कसा निर्माण करता येईल, या महत्त्वपूर्ण विषयावरडॉ. नरके मार्गदर्शन करणार आहेत.       

  डॉ.नरके आपल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, दुधाचा दर्जा सुधारणा तसेच उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळवण्याचे मार्ग स्पष्ट करणार आहेत.या परिषदेमुळे शेतकरी व दूध उत्पादकांना उद्योगातील तज्ज्ञ आणि नामांकित कंपन्यांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार असून, आधुनिकपद्धतींचा अवलंब करून दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व नफ्याचा करण्यासाठी दिशा मिळणारआहे.    

 डॉ. नरके यांची ही निवड कोल्हापूरजिल्ह्यातील दूध उत्पादक क्षेत्रासाठी मानाचा तुरा ठरत असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या दुग्ध क्षेत्राची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.

 त्यांच्या मार्गदर्शनाचा देश-विदेशातील शेतकरी व दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणारअसल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes