SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंदकोल्हापूर एलसीबीचा मोठा दणका: भरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्तभरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त ए. आय. - बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा : डॉ.सुदीप काळेकोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या ४३ कोटींच्या विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला आढावासामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्नसावधान! अक्षयतृतीयेला बालविवाह केल्यास होईल जेल; कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहनअण्णासाहेब पाटील महामंडळाकडून लाभार्थ्यांना डिजिटल प्रशिक्षण व व्यवसायासाठी पाठबळमुलींच्या वसतीगृहात सामाजिक सप्ताह उत्साहात साजराकोल्हापूर शहर-जिल्हा NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताहाचा समारोह .

जाहिरात

 

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून लाभार्थ्यांना डिजिटल प्रशिक्षण व व्यवसायासाठी पाठबळ

schedule13 Apr 26 person by visibility 125 categoryराज्य

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत डिजिटल प्रशिक्षण उपक्रम व मार्केटिंग टॅब सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सक्षम पाठबळ देण्यात येत आहे.

व्यवसाय वर्धन (Marketing Tab): स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ - अनेक लघुउद्योजकांकडे दर्जेदार उत्पादने असली तरी त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. हीच समस्या दूर करण्यासाठी महामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन (Business Promotion) मार्केटिंग टॅब विकसित केला आहे.
हा मार्केटिंग टॅब प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जसे की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि इंडियामार्ट यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, फोटो, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करण्याची सुविधा मिळते. सध्या या प्लॅटफॉर्मवर 27,500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका याप्रमाणे सर्च सुविधा देण्यात आली असून, नागरिकांना या सुविधेचा वापर करून जवळच्या महामंडळाच्या लाभार्थ्यांची माहिती शोधता येईल व त्यांच्या उत्पादनांचा व सेवांचा लाभ घेता येईल.

2. डिजिटल प्रशिक्षण: यशस्वी व्यवसायाची पायाभरणी - अनेक लाभार्थ्यांकडे व्यवसाय करण्याची इच्छा असली तरी त्यांना व्यवस्थापन, तांत्रिक माहिती, मार्केटिंग, ग्राहक हाताळणी, आर्थिक नियोजन आणि डिजिटल साधनांचा वापर याबाबत पुरेशी माहिती नसते. हीच गरज ओळखून महामंडळाने वेबिनार, यु ट्युब आणि पॉडकास्ट यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत.
व्यवसाय कसा सुरू करावा व वाढवावा, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग कशी करावी, डिजिटल मार्केटिंग व सोशल मीडियाचा वापर, ग्राहकांशी संवाद व विक्री कौशल्ये, आर्थिक नियोजन व नफा वाढविण्याचे मार्ग अशा विविध प्रशिक्षणांद्वारे लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध व्यवसायांबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ अधिकृत यु ट्युब व फेसबुकवर उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेता येते. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

3. डिजीलॉकर समावेश- महामंडळाने डिजीलॉकर सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट (integrate) केली आहे. त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व विश्वासार्ह करण्यात आलेली आहे. भविष्यात MAHA-ID व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) इंटिग्रेशन बाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes