डेन्मार्कच्या व्हिक्टोरियाने पटकावला मिस युनिव्हर्सचा किताब
schedule17 Nov 24 person by visibility 459 categoryविदेश

मुंबई : डेन्मार्कची व्हिक्टोरिया केजर थेलविग हिने ७३ व्या मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भारताची रिया सिंघा टॉप १२ स्पर्धकांत स्थान मिळवू शकली नाही.
मेक्सिको सिटीतील एरिना सीडीएमएक्स येथे सौंदर्य स्पर्धा पार पडली. व्हिक्टोरिया केजर थेलविगने प्रतिष्ठित मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला. नायजेरियाची चिदिम्मा अदेत्शिना फर्स्ट रनर-अप आणि मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान सेकंड रनर-अप ठरली. या सौंदर्य स्पर्धेतील टॉप ५ फायनलिस्टमध्ये थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री आणि व्हेनेझुएलाची इलियाना मार्केझ यांचा समावेश होता.
व्हिक्टोरियाला २०२३ ची मिस युनिव्हर्स निकाराग्वाची शेनिस पॅलासिओस हिने २०२४ च्या विजेतेपदाचा मुकूट परिधान केला. या वर्षी जगभरातील १२० हून देशातील सौंदर्यवतीने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.