SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोव्यात ‘गोकुळ’च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतयूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्यगडमुडशिंगी येथे एन. सी. एस., न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्तविद्यमाने मेगा जॉब फेअरचे सोमवारी आयोजनकोल्हापुरात 39 घरामध्ये आढळल्या डेंग्यू डासाच्या अळया; 14 तापाचे रुग्ण आढळले; कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे सर्वेक्षण २ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार, चोरीचा माल घेणाऱ्या ३ तिघासह ५ आरोपींना अटक; घरफोडीचे १२ गुन्हे उघड !जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट पर्यंत...पूर्वापार गाडीवाट रस्त्याचा वाद सामंजस्याने निकाली काढण्याचे प्रयत्न : तहसीलदार ऋषिकेत शेळके डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवडसंजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET - २०२५ मध्ये चमकदार कामगिरीबबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : माजी आमदार जयश्री जाधव यांची भावना

जाहिरात

 

कोल्हापुरात 39 घरामध्ये आढळल्या डेंग्यू डासाच्या अळया; 14 तापाचे रुग्ण आढळले; कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे सर्वेक्षण

schedule03 Jul 25 person by visibility 141 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभाग व आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून शहरामध्ये आज 3694 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 39 घरांमध्ये डेंग्यु डासाच्या अळ्या आढळून आल्या. शहर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत दैनंदिन सर्व्हेक्षण सुरु आहे. 

प्रामुख्याने या सर्व्हेक्षणात कावीळ, डेंग्यू या आजाराचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. आज शहरामध्ये 15,582 नागरीकांची तपासणी केली असता या तपासणीत 14 तापाचे रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर 2 नागरीकांचे रक्तजल नमुने तपासणीठी घेण्यात आले. यावेळी 4487 घरांतील कंटेनरची तपासणी केली असता 55 कंटेनरमध्ये आळ्या आढळून आल्या. त्यातील 45 कंटेनर रिकामी करुन उर्वरीत 10 कंटेनरमध्ये टॅमिफॉस हे औषध टाकण्यात आले.

  हे सर्व्हेक्षण प्रामुख्याने महाकाली मंदिर, संध्यामठ गल्ली, राजघाट रोड, आयरेकर गल्ली, रंकाळा रोड, करवीर तीर्थ अपार्टमेंट, गांधी मैदान परिसर, देशपांडे गल्ली, साकोली कॉर्नर, राजारामपुरी, यादवनगर, शाहूनगर, शाहुपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, दौलतनगर, जागृती नगर, प्रतिभानगर, सम्राटनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, उलपे मळा, शुगर मिल, गोळीबार मैदान, मेन रोड कसाबा बावडा, नागलवाडी परीसर, लाईन बाजार, सरलष्कर पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शिवाजी पार्क, कनाननगर, राजेंद्रनगर, नेहरूनगर, जवाहरनगर, सुभाष नगर, मोती नगर, वर्षा नगर, रामानंदनगर, जरगनगर, साळोखेनगर, खणभाग, एसएससी बोर्ड, गंगाई लॉन, अंबा टॅक, हरी ओमनगर, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, बोंद्रेनगर, गोविंद पार्क, निंबाळकर माळ, विश्वकर्मा, संजय गांधी पार्क, महालक्ष्मी नगर, पाटोळेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, जमादार कॉलनी, माळ गल्ली, करंडे माळ, बापट कॅम्प, गवळ गल्ली, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, न्यू पॅलेस, रमण मळा, सिद्धार्थ नगर, गोविंद पार्क, नाळे कॉलनी, रचनाकर हाऊसिंग सोसायटी, सुर्वेनगर, बापूरामनगर, प्रथमेशनगर, देवकर पानंद, जनाई दत्तनगर, पाचगाव रोड, अनंत प्राईड, सुर्वे कॉलनी, साळोखेनगर, शिवगंगा कॉलनी, हडको कॉलनी या भागामध्ये करण्यात आले. यावेळी आशा वर्कर्समार्फत या भागात जनजागृती करण्यात आली. 

तसेच नागरीकांनी स्वच्छ साठलेले व साठविलेले पाणी आठवडयातून एकदा रिकामे करुन कोरडा दिवस पाळणे अत्यंत आवश्यक असत्याचे सांगण्यात आले. तसेच ताप आल्यास नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes