SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोव्यात ‘गोकुळ’च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतयूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्यगडमुडशिंगी येथे एन. सी. एस., न्यू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्तविद्यमाने मेगा जॉब फेअरचे सोमवारी आयोजनकोल्हापुरात 39 घरामध्ये आढळल्या डेंग्यू डासाच्या अळया; 14 तापाचे रुग्ण आढळले; कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे सर्वेक्षण २ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार, चोरीचा माल घेणाऱ्या ३ तिघासह ५ आरोपींना अटक; घरफोडीचे १२ गुन्हे उघड !जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट पर्यंत...पूर्वापार गाडीवाट रस्त्याचा वाद सामंजस्याने निकाली काढण्याचे प्रयत्न : तहसीलदार ऋषिकेत शेळके डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवडसंजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET - २०२५ मध्ये चमकदार कामगिरीबबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : माजी आमदार जयश्री जाधव यांची भावना

जाहिरात

 

२ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार, चोरीचा माल घेणाऱ्या ३ तिघासह ५ आरोपींना अटक; घरफोडीचे १२ गुन्हे उघड !

schedule03 Jul 25 person by visibility 227 categoryगुन्हे

कोल्हापूर : २ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार व चोरीचा माल घेणाऱ्या ३ इसमांसह एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून घरफोडीचे १२ गुन्हे उघड झाले. १२६.५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, ७९८.०२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व इतर असा एकूण १२,०३,६१०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.

कोल्हापूर शहर व परिसरात पडलेल्या गुन्हयांचा समांतर तपास सुरु असताना यापूर्वी आरोपी सलीम महंमद शेख व त्याचे साथीदारांना अटक करून त्यांचेकडून ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते. सदर आरोपींनी गुन्हे केलेचा परिसर, गुन्हा करणेची त्यांची विशिष्ट पध्दत, सदरचे आरोपी सराईत असलेने तसेच त्यांना पोलीस तपासाची बंधने, पळवाट व कायदेशीर प्रक्रिया माहिती असलेने त्याचा गैरवापर करुन त्यांनी काही मर्यादेपर्यंत गुन्हयांची कबूली व चोरीच्या मुद्देमालाची माहिती दिली होती. सदर आरोपींना ताबेत घेवून त्यांचेकडे अधिक कौशल्याने तपास करून त्यांनी आणखीन काही घरफोडीचे गुन्हे केले आहेत काय, तसेच त्या चोरीतील सोन्या चांदीचे दागीने कोणाकडे लपवून ठेवले आहेत काय याबाबत पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांचे तपास पथकाकडून अधिक तपास सुरु होता, दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी सलीम शेख व त्याचे साथीदारांनी आणखीन घरफोडीचे गुन्हे केले असून त्यातील दागीने त्यांचा मित्र दस्तगीर मुल्ला रा. मराठा बौक, जवाहरनगर, इचलकरंजी याचे मध्यस्तीने एक सोनाराकडे विकलेले आहे अशी गोपनीय माहिती मिळाली,

सदर खात्रीशीर गोपनीय बातमीचे अनुषंगाने करवीर पोलीस ठाण्यातील गुन्हयातील में. क. रिमांडमधील आरोपी नामे १) सलीम महंमद शेख वय ३७, मुळ रा. गंधारपाले, साहिलनगर, ता. महाड, जि. रायगड २) तौफिक महंमद शेख वय ३०, रा. संजय गांधी नगर, चिक्कोडी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक यांचा ताबा घेवून तपास पथकाने त्यांचेकडे स्वतंत्रपणे व कौशल्याने तपास केला असता त्यांनी कोल्हापूर जिल्हयातील करवीर पोलीस ठाणेहद्दीतील आर के नगर, मोरेवाडी व कळंबा परिसरात तसेच वडगांव, आजरा व राधानगरी परिसरात आणखीन घरफोडीचे गुन्हे केले असलेची कबूली दिल्ली, तसेच मिळाले माहितीप्रमाणे इसम नामे दस्तगीर मेहबूब मुल्ला वय ३७, रा. मराठा चौक, चीर गल्ली, स्वामी कारखानाजवळ, जवाहरनगर, इचलकरंजी याचे मध्यस्थीने ऊर्जा आझाद महालकरी वय ३६, ८.६०८, की वॉर्ड, साळोखे पार्क, कोल्हापूर याचेकडे काही चोरीतील सोन्या चांदीचे दागीने दिलेचे तसेच आरोपी तौफिक शेख याने त्याचे वाटणीचे सोन्या चांदीचे दागीने सोनार संतोष मधुसुदन नार्वेकर वय ४७, रा. फुलेवाडी, कोल्हापूर याचेकडे दिले असलेचे तपासात निष्यत्र झाले,  सर्व ५ आरोपींना ताबेत घेवून त्यांचेकडून  एकूण १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक  योगेश कुमार गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुनो अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार अमोल कोळेकर, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने, सागर चौगले, सागर माने, विजय इंगळे, महेश पाटील, महेश खोत, संजय देसाई, राजू बेडगे, नवनाथ कदम, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, सतिश सुर्यवंशी यांचे पथकाने केलेली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes