SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल

schedule02 Feb 26 person by visibility 236 categoryशैक्षणिक

इचलकरंजी :  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षा २०२५ मध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागाने उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक उत्कृष्टतेची ठाम छाप उमटवली आहे. टेक्स्टाईल डिप्लोमाच्या तिन्ही विभागातून श्रेय शैलेश गजमल ९३.६५ टक्के गुण मिळवत संपूर्ण डिप्लोमा विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेत संस्थेतील ८५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर १२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, हा भरीव निकाल डीकेटीई संस्थेची गुणवत्ताधिष्ठित शिक्षणप्रणाली, सातत्यपूर्ण अध्यापन व निकालभिमुख दृष्टिकोन अधोरेखित करणारा आहे.


 विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत व चिकाटी, अनुभव आणि तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अभ्यासकेंद्रीत व शिस्तबध्द शैक्षणिक वातावरण, अद्ययावत प्रयोगशाळा सुविधा तसेच संस्थेची दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक धोरणे यांचा मोलाचा वाटा आहे.

डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चर्स विभागातील प्रथम वर्षात- दर्शन श्रीश्रीमल ९०.४७ टक्के, सोहम मर्दा ८३.६५ टक्के, यश चितलांगिया ८३.५३ टक्के, द्वितीय वर्षात - आर्यन जाधव ९१.७७ टक्के, साकिब नदाफ ८९.१८ टक्के, प्रांजल मगदूम ८७.४१ टक्के, तृतीय वर्षात - शंतनू केस्तीकर ८९.६८ टक्के, राजवर्धन काकडे ८८.९५ टक्के, अरुष दिंडे ८५.६८ टक्के अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. संस्थेतील डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी विभागात दृष्टी उमारानिया ८०.४७ टक्के, मुजामिल मिस्त्री ७८.९४ टक्के, समकित चंगेडिया ७७.२९ टक्के, द्वितीय वर्षात प्रकाश घटटे ९०.५९ टक्के, मलिकरेहान कलावंत ८९.४१ टक्के, कार्तिक बद्रीकोठीमठ ८६.९४ टक्के, तृतीय वर्षात श्रेय गजमल ९३.६५ टक्के, शुभांगी कुंभार ९१.८८ टक्के, रेहान नायकवडी ९१.४१ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. 

तसेच डिप्लोमा इन फॅशन अँण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी विभागात प्रथम वर्षात- आदिती साखरे ८५.१८ टक्के, सुपर्णा पाटील ८२.२४ टक्के, मादिया बोरकर ८०.७१ टक्के, द्वितीय वर्षात- प्रतिभा मगदूम ९०.०० टक्के, ईश्‍वरी रंगापुरे ८५.०६ टक्के, समिक्षा वसवाडे ८२.५९ टक्के, तृतीय वर्षात- आरती जाधव ८७.४१ टक्के, पूर्वा जाधव ८६.३५ टक्के व श्रेया सरबी ८१.०६ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला.    

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, व सर्व ट्रस्टी यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ एल.एस.अडमुठे, उपप्राचार्य डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख प्रा.आर.के.वळसंग सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल

schedule08 Jul 25 person by visibility 869 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परिक्षा २०२५ मध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाच्या तिन्ही विभागातून आरती जाधव हिला ९२.७० टक्के गुणांसह डिप्लोमा विभागात सर्वप्रथम आली आहे. संस्थेतील ८२ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये तर ११६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

 विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डीकेटीई संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. हे यश मिळविण्यात विद्यार्थ्यांसोबतच तज्ञ प्राध्यापकवर्ग, अभ्यासकेंद्रीत वातावरण, अद्यायवत लॅब्स आणि संस्थेच्या शिस्तबध्द शैक्षणिक धारेणांचा मोलाचा वाटा आहे.

डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स विभागातील प्रथम वर्षात- आर्यन जाधव ८४.७६ टक्के, प्रांजल मगदुम ८३.०६ टक्के, सकीब नदाफ ८१.५३ टक्के, द्वितीय वर्षात - शंतनु केस्तीकर ९१.०५ टक्के, राजवर्धन काकडे ८९.९५ टक्के, श्रेयश शिरगुप्पे ८४.२९ टक्के, तृतीय वर्षात - मोईन तांबोळी ८९.७६ टक्के, सुदर्शन मगदुम ८९.२९ टक्के, कृष्णा मगदुम ८४.६५ टक्के अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. संस्थेतील डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी विभागात मलिकरेहान कलावंत ८७.४७ टक्के, कार्तिक बिद्रीकोठीमठ ८२.७६ टक्के, प्रकाश घटटे ८२.२९ टक्के, द्वितीय वर्षात श्रेय गजमल ८५.३५ टक्के, शुभांगी कुंभार ८३.५४ टक्के, निरज नाईक ८१.९२ टक्के, तृतीय वर्षात रोहित कुंभार ८७.४६ टक्के, प्राजक्ता माने ८७.२४ टक्के, पूर्वा काळे ८६.२७ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. तसेच डिप्लोमा इन फॅशन अँण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी विभागात प्रथम वर्षात- प्रतिभा मगदुम ८५.५९ टक्के, पूजा चौधरी ८४.३५ टक्के, ईश्‍वरी रंगापुरे ८०.३५ टक्के, द्वितीय वर्षात- आरती जाधव ९२.७० टक्के, पूर्वा जाधव ८९.८३ टक्के, श्रेया सरबी ८५.३२ टक्के, तृतीय वर्षात- निशा शिंत्रे ८६.७३ टक्के, वेदांती माळी ८२.९१ टक्के व अमृता कांबळे ८२.५५ टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला.    

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सर्व ट्रस्टी यांनी भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना संचालिका डॉ एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख प्रा.आर.के.वळसंग सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes