SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय क्रीडा दिन : खेळांमुळे घडते सक्षम राष्ट्र भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रमवाशी नाका फायरिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश खाडे अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईबिष्णोई ००७ गँगचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड कोल्हापुरात जेरबंद! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची थरारक कारवाईडीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अ‍ॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवडकाळम्मावाडी सबस्टेशनवरील महावितरणच्या कामामुळे 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा कमी दाबानेरंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; RRR तंत्रज्ञानाद्वारे पुनरुज्जीवनाचा प्रस्तावडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘युरेका 2026’ आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न कोल्हापूर शहराच्या आरोग्य सुविधांना मिळणार नवी दिशा: महानगरपालिका आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णयवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मनगटावर लाडक्या भगिनींच्या प्रेमाची राखी; "माता-भगिनींचे आशीर्वाद हेच माझे खरे सुरक्षा कवच" - हसन मुश्रीफ

जाहिरात

 

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘युरेका 2026’ आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न

schedule28 Aug 26 person by visibility 344 categoryशैक्षणिक

🔲आयआयटी मुंबई, टेक्निकलच्या ई-सेलचे मार्गदर्शन

तळसंदे : डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे आयआयटी मुंबई  टेक्निकल कॅम्पसच्या ई-सेलच्या मार्गदर्शनाखाली ‘युरेका! 2026’ ही आयडिया पिचिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील नवोपक्रमशीलता, उद्योजक वृत्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर, परीक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेत विविध विभागांतील ४१ विद्यार्थी संघांनी  सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी, तांत्रिक आणि उद्योजकीय संकल्पनांवर आधारित अभिनव कल्पना प्रभावीपणे सादर केल्या. आपल्या कल्पनांची व्यावसायिक क्षमता, सामाजिक परिणाम, अंमलबजावणीची शक्यता आणि भविष्यातील व्यवसाय संधी याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षकांसमोर मांडणी केली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून योगेश पाटील,  प्रा. विशाल पुंदीकर,  आरिफ शेख आणि प्रा. ए. एस. फरास यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे मूल्यमापन करताना नवोपक्रम, उद्योजकता आणि व्यवसाय विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या स्पर्धेत वेदिका अर्जुन मोरे , वैभवी विनायक गुरवाल, सई  संजय मुळे  यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर आदित्य नंदकुमार माने याने द्वितीय तर संकेत मगदूम , हर्ष बाबासो सातपुते , गौरव गजानन चव्हाण , वैष्णव निलेश पाटील तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस. आर. पावसकर म्हणाले, या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांकडे केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून न पाहता त्यांचे प्रत्यक्ष व्यवसायाच्या संधींमध्ये रूपांतर करण्याची दिशा मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकतेची संस्कृती रुजविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील. 

ई-सेल समन्वयक प्रा. शोएब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ई-सेल विद्यार्थी अध्यक्ष प्रतीक तुपे यांनी विद्यार्थी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. प्राची पाटील आणि श्रेया वारंगे यांनी सूत्रसंचालन केले.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, असिस्टंट रजिस्ट्रार जितेंद्र पोवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes