SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षक दिन: ज्ञानाचा आणि संस्कारांचे जतन करणारा उत्सवजात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढबोगस दस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळमध्ये विजय महायुतीचाच होणार, पण इतका त्रास का झाला? मंत्री हसन मुश्रीफ यांचा थेट सवाल!माविमच्या कोल्हापुरी चप्पलला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहकार्य करु : जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुखकोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती आक्रमक; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आदेशकोल्हापूर : बाजार गेट, पान लाईन परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाईमहिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा दिमाखात शुभारंभ!के.एम.टी.च्या भंगार साहित्याच्या ई-लिलावातून ५२.३१ लाखांची बोलीकोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई: शेल कंपनीच्या नावाखाली म्युल बँक खाती चालवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर

schedule04 Sep 26 person by visibility 212 categoryउद्योग

◼️लवकरच कर्नाटकात होणार विस्तार, वार्षिक सर्वसाधारण सभेत  अरूंधती महाडिक यांची माहिती

कोल्हापूर  : उज्वल भविष्यासाठी योग्य आर्थिक बचत महत्वाची असते. सर्वसाधारण कुटूंबातील महिलांना एकदम मोठया रकमेच्या ठेवी ठेवणे शक्य नसते. त्यामुळे पिग्मीच्या स्वरूपात दररोज बचत करावी, असे आवाहन भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा  अरूंधती महाडिक यांनी केले. पतसंस्थेचे आता मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर झाले असून, लवकरच गडहिंग्लजसह कर्नाटकात शाखा विस्तार होणार असल्याचे  महाडिक यांनी सांगितले. कोल्हापुरातील महालक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कोल्हापुरात पार पडली.  अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून ३ वर्षापूर्वी भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची उभारणी झाली. अल्पावधीतच या संस्थेचे सभासदांचा विश्‍वास दृढ करत, मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतरण झाले आहे.

 आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी गणेश वंदना आणि स्तोत्र पठण झाले. संस्थेच्या अध्यक्षा  अरूंधती महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्‍वराज महाडिक, मंजिरी महाडिक, अर्पिता जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनानं सभेला प्रारंभ झाला. संस्थेच्या अध्यक्षपदी अर्पिता जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन ऑडिटर शिवराज मगर यांनी केले. तर संचालिका सुनिता माने यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. 

सेजल शेंडगे, प्राजक्ता घोरपडे यांनी, संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. सौ. अरूंधती महाडिक यांच्या प्रयत्नातून पतसंस्थेला अवघ्या तीन वर्षात मल्टिस्टेटचा दर्जा प्राप्त झाला. लाडकी बहिण, बचत गटांसाठी योजना, स्वनिधी अशा योजनांमुळे महिलांचा आर्थिक िवकास होत आहे. त्यातून नवी पिढी अधिक स्वावलंबी आणि उत्तम जीवन जगू शकेल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. तर ही संस्था केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, सभासदांचा विश्‍वास, सहकार्य मिळवून सामाजिक भान बाळगणारी संस्था असल्याचे  अरूंधती महाडिक यांनी सांगितले. संस्थेने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ सभासदांनी घेण्याचे आवाहन  अरूंधती महाडिक यांनी केले.

 लवकरच गडहिंग्लज मध्ये संस्थेची शाखा सुरू होत असून, नजीकच्या काळात बेळगावसह कर्नाटकात शाखा विस्तार केला जाईल, असे  महाडिक यांनी जाहीर केले. 

दरम्यान प्राजक्ता घोरपडे, प्रियांका अपराध, पुष्पा पोवार, भाग्यश्री शेटके, स्मिता माने, अर्पिता जाधव, सेजल शेंडगे, मंगल बनसोडे, आदिती मगर या संचालकांचा अमर उरूणकर, संगीता खाडे, शिवानी पाटील, शरयू भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निलम नलवडे, रिमा मेस्त्री, धनश्री पाटील, ए के पाटील, दिपक साळोखे या कर्मचार्‍यांसह सभासद उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes