SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहनगडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटनभारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून 'करिअर मार्गदर्शन'; हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंगशक्तिपीठ महामार्ग अलाइनमेंट बदल नको संपूर्ण महामार्ग रद्द करा; आजरा येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात निर्धारअण्णासाहेब पाटील महामंडळाची वैयक्तिक व गट कर्ज सुलभ परतावा योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धेचे आयोजनकोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे होणार उद्घाटन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोल्हापूर दौराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवादटायटॅनिक: एका भव्य स्वप्नाचा महासागरातील अंत

जाहिरात

 

‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

schedule15 Apr 26 person by visibility 69 categoryराज्य

🔹प्रशासकीय शिस्तपालन व संसाधनाच्या प्रभावी वापराचे निर्देश; व्यापक सुधारणा आराखडा बनवावा

मुंबई : २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईम बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि जबाबदारी निश्चिती या तत्वांवर भर देत लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण उत्पन्न ११,४७५ कोटी रुपये तर खर्च १२,०६६ कोटी रुपये झाला. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये. खर्च ३३ कोटी रुपये झाला.

मागील आर्थिक वर्षात जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे  विभाग नफ्यात होते. उर्वरित २३ विभागांनी कामगिरी सुधारण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

“येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे. दैनंदिन तोटा भरून काढणे हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे,” असे ते म्हणाले.

नफ्यात नसलेल्या विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणांची मिमांसा करावी व त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

नागपूर विभागातील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes