SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
काळाची क्रूर थट्टा! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची गाडी विहिरीत; ९ जणांचा दुर्दैवी अंतमोदींची १२ वर्षे म्हणजे राष्ट्रउभारणीचे महातप; भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशजीकोल्हापूर महानगरपालिका 'पथकर' आकारण्याच्या निर्णयावर उत्तम पाटील यांची नाराजीठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्तप्रलंबित बिलांमुळे ठेकेदार आर्थिक संकटात; राज्यभर एकाच वेळी आंदोलनाचा इशाराडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया; ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम एमपीएससी परीक्षा: कोल्हापुरात चोख बंदोबस्तात परीक्षा पारगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कारअमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावा

जाहिरात

 

अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावा

schedule14 Jun 26 person by visibility 242 categoryराज्य

  ▪️सभास्थळ पाहणीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन बैठकीत सहभाग

  कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा हे दिनांक १९ व २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या आणि पोलीस ग्राऊंडवरील भव्य सभेच्या तयारीचा आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. यानिमित्त त्यांनी सभास्थळाची पाहणी केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विभागनिहाय नियोजन बैठकीत सहभाग घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

  पोलीस ग्राऊंड येथे आयोजित सभेच्या अनुषंगाने चंद्रकांतदादा पाटील यांनी मंडप उभारणी, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, व्हीआयपी रूट, सुरक्षा नियोजन तसेच अन्य आवश्यक सुविधांची सविस्तर पाहणी केली. सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने सर्व व्यवस्था शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
यावेळी महापौर रूपाराणी निकम, भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, मुरलीधर जाधव, सुजितभाऊ चव्हाण, प्रसाद चव्हाण, तानाजी पाटील, डॉ. राजवर्धन, अमर साठे, आप्पा लाड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, ओएसडी बी. बी. यादव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी सहभाग घेतला. या बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर हे ऑनलाईन लिंकद्वारे उपस्थित होते. तसेच नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, पोलीस अधीक्षक निलोत्पल जिल्हाधिकारी राठोड, महापौर रूपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे, विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, सुजित चव्हाण, भैया माने, आदिल फारस, सुमित कदम यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  बैठकीत अमितभाई शहा यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, अग्निशमन, स्वच्छता, आपत्कालीन यंत्रणा, पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या सुविधांबाबत करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

  यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखून नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. दौऱ्यादरम्यान नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या सर्व बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "अमितभाई शहा यांचा कोल्हापूर दौरा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रशासन आणि पक्ष संघटना यांच्या समन्वयातून सर्व कार्यक्रमांचे नियोजन सुरू असून प्रत्येक व्यवस्था दर्जेदार आणि शिस्तबद्ध पद्धतीने उभारली जात आहे. सभेला मोठ्या प्रमाणावर जनसहभाग अपेक्षित असून हा दौरा आणि सभा निश्चितच यशस्वी व ऐतिहासिक ठरेल."
केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या स्वागतासाठी आणि दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पक्ष, महायुतीचे कार्यकर्ते तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes