SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : तावडे हॉटेल परिसरात पहिल्या दिवशी 108 मिळकतींचा सर्व्हेकृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मामहाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 26 एप्रिललापरदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहनलोकसहभागातून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा' अभियान यशस्वी करूया : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ शिवनाकवाडी नळ पाणीपुरवठा योजनेस २.७१ कोटींची तांत्रिक मान्यता : आमदार यड्रावकर“सुनावणीत विलंब, आकडेवारीत तफावत” — 1200 दूध संस्थांचा संताप; प्रशासनावर गंभीर आरोपमोबाईलपेक्षा पुस्तकच श्रेष्ठ; जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉ. अजितकुमार पाटील यांचे पालकांना कळकळीचे आवाहन मोबाईलपेक्षा पुस्तकच श्रेष्ठ; जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉ. अजितकुमार पाटील यांचे पालकांना कळकळीचे आवाहन ३०० दिवस, ३०० मैफिली : ‘निक्षय गीत’ उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

जाहिरात

 

परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

schedule24 Apr 26 person by visibility 130 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत असून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातील पात्र विद्यार्थ्यांकडून विविध शाखा व अभ्यासक्रमांसाठी एकूण ७५ जागांसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या शिष्यवृत्ती संदर्भातील शासन निर्णय, अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच पात्रतेच्या अटी-शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी
https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in⁠
आणि https://dirobbwd.maharashtra.gov.in⁠
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्यासाठी https://fs.maharashtra.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून सर्व कागदपत्रे ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने सादर करावीत. तसेच अर्जाची छापील प्रत आवश्यक स्वहस्ताक्षरीत (Self Attested) कागदपत्रांसह दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे (आकार प्रिमायसेस, दुसरा मजला, एम.एच.बी. कॉलनी, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे – ४११००६) येथे जमा करणे बंधनकारक आहे.

निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही,अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes