मोबाईलपेक्षा पुस्तकच श्रेष्ठ; जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉ. अजितकुमार पाटील यांचे पालकांना कळकळीचे आवाहन
schedule24 Apr 26 person by visibility 182 category
कोल्हापूर : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 चे केंद्रमुध्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी पालक आणि माता-भगिनींना वाचन संस्कृती जोपासण्याबाबत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. पुस्तक हेच खरे ज्ञानमंदिर असून ज्याप्रमाणे मंदिरात देवाचा वास असतो, त्याचप्रमाणे पुस्तकात ज्ञानाचा वास असतो, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. देव दर्शनाने शांती मिळते, तर पुस्तक वाचनाने माणसाला शहाणपण लाभते, या विचाराने त्यांनी आजच्या डिजिटल युगात मुलांच्या हातात मोबाईल की पुस्तक हा कळीचा प्रश्न पालकांसमोर मांडला आहे.
पालकांसाठी पाच सुवर्ण नियम सांगताना डॉ. पाटील म्हणाले की, मुलांवर केवळ अभ्यासाचा दबाव न टाकता त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी घरात मोबाईलमुक्त झोन ऐवजी एक आकर्षक वाचन कोपरा तयार करावा. मुलांसाठी पालक हेच खरे रोल मॉडेल असतात, त्यामुळे पालकांनी स्वतः वाचनाची सवय लावून घेतल्यास मुले त्यांचे अनुकरण करतील. मुलांच्या गुणांपेक्षा त्यांनी आज काय नवीन वाचले याला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. वाढदिवसाला महागड्या कपड्यांऐवजी पुस्तक भेट देऊन त्यांच्या विचारांना चालना द्यावी. तसेच मुलांकडून चूक झाल्यास त्यांना शिक्षा म्हणून एखादी गोष्ट वाचायला सांगून त्यातून संस्कार देण्याचा अभिनव मार्ग त्यांनी सुचवला आहे.
विशेषतः माता-भगिनींना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, आई ही मुलांची पहिली गुरू असते. मुलाला माणूस म्हणून घडवण्यात पुस्तकांचा मोठा वाटा असतो. अंगाई गाताना मोबाईलचा वापर करण्याऐवजी गोष्टी सांगणे, स्वतः काम करताना वाचनाची सवय ठेवणे आणि मुलांच्या पर्समध्ये किंवा बॅगेत पुस्तकाची ओळख करून देणे यातून पिढी समृद्ध होऊ शकते. मोबाईलमुळे मूल केवळ गप्प बसते, मात्र पुस्तकामुळे ते खऱ्या अर्थाने घडते. एकविसाव्या शतकात भारताला सत्ताधीश बनवण्यासाठी मुलांमध्ये आत्मविश्वास, देशभक्ती आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक केवळ वाचनानेच शक्य आहे. या जागतिक पुस्तक दिनी आपल्या घराला केवळ स्क्रीन-फ्री न ठेवता पुस्तक-फुल करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मोबाईलपेक्षा पुस्तकच श्रेष्ठ; जागतिक पुस्तक दिनानिमित्त डॉ. अजितकुमार पाटील यांचे पालकांना कळकळीचे आवाहन
schedule24 Apr 26 person by visibility 182 categoryशैक्षणिक