व्यवसाय वृध्दी व उत्पादनाची पोर्टलवर होणार जाहिरात
schedule03 Feb 26 person by visibility 154 categoryराज्य
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या लाभार्थीसाठी महामंडळच्या अधिकृत www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Business Promotion (व्यवसाय वृद्धी) हा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महामंडळचे लाभार्थी आपली सेवा, उत्पादने त्यांची किंमत तसेच वैशिष्ट्ये यासह व्यवसायाशी संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर अपलोड करू शकणार आहेत.
या अंतर्गत लाभार्थ्यांना व्यवसायाचे नाव, व्यवसायाचा प्रकार, उत्पादने अथवा सेवा, किंमत, वैशिष्ट्ये, संपर्क तपशील व इतर आवश्यक माहिती पोर्टलवर नोंदविता येणार आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्याच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळेल. स्थानिक उत्पादने व सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध होतील. तसेच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
महामंडळाच्या सर्व संबंधित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली आवश्यक माहिती तात्काळ पोर्टलवर अपलोड करावी. याबाबत कोणतीही अडचण अथवा मार्गदर्शनासाठी संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजायसिंह देशमुख यांनी केले आहे.