SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुनीलकुमार सरनाईक यांचे निधनकोल्हापुरात काँग्रेस मंगळवार, बुधवारी घेणार इच्छुकांच्या मुलाखतीकोल्हापूर महानगरपालिका : उल्लेखनीय काम केलेल्या 54 कर्मचाऱ्यांचा सत्कारशिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या 10 विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापूर महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणबुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर अजिंक्यमहापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वासराज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकालमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी.पी.टी.पी. २०११ बॅच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची ‘गोकुळ’ दूध संघाला अभ्यास भेटइचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

schedule09 Dec 25 person by visibility 171 categoryसामाजिक

मुंबई : राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

परिवहन विभागाने सांगितले आहे की, फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे ‘चलन बाकी आहे’, ‘परवाना सस्पेंड होणार आहे’ अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले की, आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही. तसेच ‘RTO Services.apk’, ‘mParivahan_Update.apk’, ‘eChallan Pay.apk’ अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी VAHAN – (वाहन नोंदणी) https://vahan.parivahan.gov.in, SARATHI (ड्रायव्हिंग लायसन्स सेवा) https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवा पोर्टल

https://www.parivahan.gov.in  तसेच ई-चालान पोर्टल

https://echallan.parivahan.gov.in  या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टलचे https://www.cybercrime.gov.in, सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes